-
बॉलिवूडचे अनेकांना आकर्षण आहे. या क्षेत्रात अमाप पैसा आणि प्रसिद्धी आहे. मात्र सिनेसृष्टीप्रमाणेच मालिका विश्वाचीही लोकप्रियता प्रचंड आहे. येथील अनेक कलाकार अतिशय प्रसिद्ध असून श्रीमंतीच्या बाबतीत ते मोठमोठ्या चित्रपट कलाकारांना टक्कर देऊ शकतात.
-
मालिका विश्वात असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपल्या हिमतीवर लोकप्रियता तर मिळवलीच, पण त्याचबरोबर अमाप पैसाही कमवला. अनेक कलाकार एका दिवसाचे मानधन म्हणून मोठी रक्कम घेतात.
-
आज आपण मालिका विश्वातील सर्वांत श्रीमंत कलाकारांचे एका दिवसाच्या मानधनाची रक्कम जाणून घेऊया.
-
मालिका विश्वातून नावारूपाला आलेला आणि त्यानंतर चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये आपली छाप सोडलेला अभिनेता रोनीत रॉय सध्या ‘स्वर्ण घर’ आणि ‘बड़े अच्छे लगते हैं 2’ या मालिकांमध्ये दिसत आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोनीत रॉय एक एपिसोडसाठी सव्वा लाख रुपये मानधन घेतो.
-
अभिनेता राम कपूरही एक एपिसोडसाठी सव्वा लाख रुपये मानधन घेतो.
-
‘कसौटी जिंदगी की 2’ आणि ‘ये है मोहब्बतें’ मालिकेत काम केलेला करण पटेल एका एपिसोडसाठी जवळपास सव्वा लाख रुपये घेतो, असे काही रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.
-
‘कुमकुम भाग्य’ फेम अभिनेता मिशाल रहेजाचाही सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीमध्ये समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार मिशाल एका एपिसोडसाठी जवळपास दीड लाख रुपये मानधन घेतो.
-
हिना खान ही मालिका विश्वातील आघाडीची अभिनेत्री आहे. काही रिपोर्ट्समध्ये दिलेल्या माहितीनुसार ती एका एपिसोडसाठी मोठी रक्कम घेते.
-
हिना खानला ‘ये रिश्ता क्या केहलाता हैं’ या मालिकेतून प्रसिद्धी मिळाली. त्यावेळेस ती प्रति एपिसोड ८० हजार रुपये मानधन घ्यायची.
-
मात्र, ‘कसोटी जिंदगी की २’ मालिकेसाठी ती एका एपिसोडसाठी जवळपास २ लाख रुपये मानधन घ्यायची.
-
लोकप्रियतेच्या बाबतीत विनोदी अभिनेता सुनील ग्रोवरही कोणापेक्षा कमी नाही. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो एका एपिसोडसाठी जवळपास १० ते १२ लाख रुपये मानधन घेतो.
-
अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, विनोदी अभिनेता कपिल शर्मा प्रति एपिसोडसाठी सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. असे म्हटले जाते की कपिल एका एपिसोडसाठी जवळपास ५० लाख रुपये मानधन घेतो.

“मी साडेचार वर्षांपूर्वी डेटवर…”, प्राजक्ता माळीचा खासगी आयुष्याबाबत खुलासा