-
भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे.
-
दिल्लीहून घरी येत असताना भरधाव वेगात असणाऱ्या पंतच्या कारला हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.
-
पंतचा अपघात झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने तिच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे.
-
या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा टॉप परिधान केला आहे. ‘प्रार्थना करत आहे’, असं कॅप्शन तिने या पोस्टला दिलं आहे.
-
तिच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी ट्रोल केलं आहे. एकाने कमेंट करत “भाईचा अपघात झाला आहे. आणि तू इथे इन्स्टावर हॉट बनण्याचा प्रयत्न करत आहेस”, असं म्हटलं आहे.
-
“रिषभ पंत जखमी आहे. तर तू असे फोटो का शेअर करत आहेस?”, अशी कमेंटही एकाने केली आहे.
-
तर तिसऱ्या एकाने “यांचं कसलं प्रेम आहे. रिषभचा अपघात झाला आहे आणि इकडे ही मेकअप करुन फोटो पोस्ट करत आहे”, असं कमेंटमध्ये म्हटलं आहे.
-
“तुला आता बरं वाटतं असेल ना”, अशी कमेंटही एकाने केली आहे.
-
एका युजरने “तुझ्यामुळे रिषभ पंतचा अपघात झाला आहे”, असं म्हटलं आहे.
-
पंतवर देहरादूनमधील रुग्णालयामध्ये उपचार सुरु असून चाहते त्याच्यासाठी प्रार्थना करत आहेत.
-
(सर्व फोटो: उर्वशी रौतेला, रिषभ पंत/ इन्स्टाग्राम)

Union Budget 2023 Live Updates: “निवडणुका आल्या म्हणून अर्थसंकल्प सादर करायचा नाही का?” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला!