-
शाहरुख खानचा ‘कुछ कुछ होता है’ चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे.
-
या चित्रपटामधील अंजली या पात्राने प्रेक्षकांची मनं जिंकली. अंजली हे पात्र अभिनेत्री सना सईदने साकारलं होतं.
-
या चित्रपटामध्ये ती बालकलाकार म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आली. आता सनाने तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
-
अभिनेत्री सना सईदने साखरपुडा केला आहे. यादरम्यानचे काही फोटो व व्हिडीओ तिने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.
-
सनाने तिच्या आयुष्यामधील सगळ्यात सुंदर क्षण चाहत्यांबरोबर शेअर केला आहे.
-
सनाने यावेळी काळ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. यावेळी ती खूपच सुंदर दिसत होती.
-
सनाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये साबाने तिला गिफ्ट केलेली रिंग ती दाखवताना दिसत आहे.
-
तसेच होणाऱ्या नवऱ्याबरोबर तिने फोटोसाठी वेगवेगळ्या पोझही दिल्या आहेत.
-
गेल्या बऱ्याच वर्षांपासून सना साबा वॉनरला डेट करत आहे. सबा हा हॉलिवूडमध्ये साऊंड डिझायनर म्हणून काम पाहतो.
-
परदेशात राहाणारा साबा सनाबरोबरचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर करताना दिसतो.
-
सना व साबावर सध्या सोशल मीडियाद्वारे शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर, सना सईदने शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी यांच्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘कुछ कुछ होता है’ मध्ये बालकलाकार म्हणून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
-
या चित्रपटात तिने शाहरुखची मुलगी अंजलीची भूमिका साकारली होती. यानंतर सनाने ‘बादल’ आणि ‘हर दिल जो प्यार करेगा’मध्येही काम केले.
-
सन २०१२ मध्ये सनाने वरुण धवन, आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा स्टारर ‘स्टुडंट ऑफ द इयर’ मध्येही काम केले होते.

उद्धव ठाकरे ठाण्यातल्या आनंद आश्रमात का गेले नाहीत? ‘हे’ कारण आलं समोर