-
जेम्स कॅमेरॉनच्या ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ या चित्रपटाने भारतात विक्रम केला आहे. ‘अवतार २’ आता भारतात सर्वाधिक कमाई करणारा हॉलिवूड चित्रपट ठरला आहे.
-
‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ ही काल्पनिक पांडोरा ग्रहाची कथा आहे, ज्यामध्ये एक माणूस जेक सुली नाविक बनून तिथे जातो आणि त्या जमातीच्या राजकुमारीशी लग्न करून तिथेच स्थायिक होतो.
-
त्याला आता मुले झाली आहेत आणि पुन्हा एकदा या ग्रहावर माणसांनी हल्ला केला आहे, आता या चित्रपटात जेक सुली आपल्या कुटुंबाला कसे वाचवते हे आपल्याला पाहायला मिळेल.
-
जेम्स कॅमेरॉनचा ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ भारतात इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने सर्व भाषांमध्ये उत्तम कलेक्शन केले आहे.
-
अवतार: द वे ऑफ वॉटरने भारतात ४०.३० कोटी रुपयांची जबरदस्त ओपनिंग केली होती. या चित्रपटाने ४५४ कोटींची कमाई करून Avengers Endgame ला मागे टाकले आहे. ‘Avengers: Endgame’ ने भारतात एकूण ४३८ कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते.
-
‘अवतार २’ चित्रपटाचे नेट कलेक्शन ३७३.२५ कोटी रुपये झाले आहे, तर ‘Avengers: Endgame’ चे नेट कलेक्शन ३७२.२२ कोटी रुपये होते.
-
भारतातील टॉप 5 सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट
-
पहिल्या क्रमांकावर २०२२ मध्ये रिलीज झालेला ‘अवतार 2’ आहे. (Twitter)
-
२०१९ मध्ये रिलीज झालेला ‘Avengers: Endgame’ दुसऱ्या क्रमांकावर आहे.
-
२०१८ साली आलेला ‘Avengers: Infinity War’ हा चित्रपट तिसऱ्या क्रमांकावर आहे.
-
२०२१ साली आलेला ‘स्पायडरमॅन: नो वे होम’ हा चित्रपट चौथ्या क्रमांकावर आहे.
-
२०१६ मध्ये रिलीज झालेला ‘द जंगल बुक’ हा चित्रपट पाचव्या क्रमांकावर आहे. (All Photos: twitter)

एलआयसी, स्टेट बँकेतील मध्यमवर्गाची बचत धोक्यात? अदानी समूहाच्या कथित गैरव्यवहाराच्या चौकशीची काँग्रेसची मागणी