-
अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांची मुख्य भूमिका असलेला ‘पठाण’ या चित्रपटवरून सुरू असलेला वाद थांबायचे नावच घेत नाही आहे.
-
देशभरातून होणाऱ्या तीव्र विरोधानंतर आता सेन्सॉर बोर्डानेही या चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्य काढून टाकण्यास सांगितले आहेत.
-
यानंतर या चित्रपटामध्ये कोणकोणते बदल होणार आहेत याबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे. सेन्सॉर बोर्डाने वादग्रस्त ‘पठाण’ चित्रपटातून कोणते दृश्य हटवण्यास सांगितले आहे याबाबत आज आपण जाणून घेऊया.
-
पठाण चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्यातील नितंब दिसणारे क्लोजअप शॉर्ट्स, अश्लील नृत्य, तसेच सोनेरी बिकनीमधील साइड पोजला हटवण्याच्या सूचना केल्या आहे.
-
चित्रपटातील कर्नल लुथरा संभाषणातील वापरण्यात आलेला ‘रॉ’ हा शब्द बदलून ‘हमारे’ असं करण्यास सांगितलं आहे.
-
चित्रपटातील ‘लगंडे-लुले’ या शब्दांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप दर्शवला आहे. या शब्दाच्या जागी ‘टूटे-फुटे’ हा शब्दप्रयोग वापरण्याचा सल्ला दिला आहे.
-
चित्रपटात अनेक ठिकाणी PMO आणि PM या शब्दांचा वापर केला आहे. या ठिकाणी ‘प्रेसिडेंट’ किंवा ‘मिनिस्टर’ वापरण्यास सांगितले आहे.
-
चित्रपटात वापरण्यात आलेल्या ‘अशोक चक्र’ या शब्दाच्या जागी ‘वीर चक्र’ हा शब्द वापरण्यास सांगण्यात आले आहे.
-
पठाण चित्रपटात एक पात्र रॉ अधिकाऱ्याची भूमिका बजावत आहे, त्यातही बदल करण्याचा सल्ला सेन्सॉर बोर्डकडून देण्यात आला आहे.
-
चित्रपटातील एक संवादात ‘मिसेज भारत’ अशा शब्दप्रयोग करण्यात आला आहे. त्याच्या जागी ‘हमारी माता’ वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत.
-
चित्रपटातील एका दृश्यात सब टायटल्समध्ये ‘ब्लॅक प्रिजन रूस’ असे लिहण्यात आले आहे. त्या जागी ‘ब्लॅक प्रिजन’ असा बदल करण्यास सुचवले आहे.
-
चित्रपटातील ‘इससे सस्ती स्कॉच नही मिलती’ या संवादातील ‘स्कॉच’ शब्दाला ‘ड्रिंक्स’ या शब्दाने बदलण्यास सांगितले आहे.
-
सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाचे शीर्षक आणि सौजन्य इंग्रजीसह हिंदी भाषेतही लिहण्यास सांगितले आहे. (Photos: Social Media)

“…तर कसबा आणि चिंचवडची पोट निवडणूक रद्द होऊ शकते”; कायदेतज्ज्ञांचं मोठं विधान