-
शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे.
-
या चित्रपटात शाहरुखसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
-
या चित्रपटाबाबत परदेशातही प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. पठाणने आगाऊ बुकिंगच्या बाबतीत जर्मनीमध्ये KGF 2 चा विक्रम मोडला आहे.
-
याच पार्श्वभूमीवर परदेशात बंपर कमाई करणाऱ्या शाहरुख खानच्या टॉप सात चित्रपटांवर एक नजर टाकूया.
-
२०१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘चेन्नई एक्सप्रेस’ या चित्रपटाने संपूर्ण जगभरात ४२३ कोटी रुपयांची कमाई केली.
-
‘हॅपी न्यू इयर’ या शाहरुख खानच्या २०१४ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने जगभरात ४०८ कोटींची कमाई केली होती.
-
२०१५ साली प्रदर्शित झालेल्या ‘दिलवाले’ या चित्रपटाने ४०० कोटी रुपयांची कमाई केली.
-
‘रईस’ या २०१७ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३०८ कोटी रुपयांची कमाई केली.
-
२०१० साली प्रदर्शित झालेल्या ‘माय नेम इज खान’ या चित्रपटाने २८५ कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटामध्ये शाहरुख खानच्या अभिनयाचे विशेष कौतुक करण्यात आले होते.
-
२०११ साली प्रदर्शित झालेल्या ‘डॉन २’ने २८० कोटी रुपयांची कमाई केली.
-
२०१२ साली प्रदर्शित झालेल्या ‘जब तक है जान’ या चित्रपटाने जगभरात २११ कोटी रुपयांची कमाई केली होती.
-
‘रा-वन’ या २०११ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २०७ कोटी रुपयांची कमाई केली.
-
२०१८ साली प्रदर्शित झालेल्या ‘झिरो’ या चित्रपटाने जगभरात १९१.४४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. (Photo: Social Media)

Video: सिद्धार्थ-कियाराने लग्नानंतर वाटली मिठाई; अभिनेत्रीच्या साध्या मंगळसूत्राने वेधलं लक्ष