-
शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे.
-
या चित्रपटात शाहरुखसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
-
या चित्रपटाबाबत परदेशातही प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. पठाणने आगाऊ बुकिंगच्या बाबतीत जर्मनीमध्ये KGF 2 चा विक्रम मोडला आहे.
-
याच पार्श्वभूमीवर परदेशात बंपर कमाई करणाऱ्या शाहरुख खानच्या टॉप सात चित्रपटांवर एक नजर टाकूया.
-
२०१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘चेन्नई एक्सप्रेस’ या चित्रपटाने संपूर्ण जगभरात ४२३ कोटी रुपयांची कमाई केली.
-
‘हॅपी न्यू इयर’ या शाहरुख खानच्या २०१४ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने जगभरात ४०८ कोटींची कमाई केली होती.
-
२०१५ साली प्रदर्शित झालेल्या ‘दिलवाले’ या चित्रपटाने ४०० कोटी रुपयांची कमाई केली.
-
‘रईस’ या २०१७ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३०८ कोटी रुपयांची कमाई केली.
-
२०१० साली प्रदर्शित झालेल्या ‘माय नेम इज खान’ या चित्रपटाने २८५ कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटामध्ये शाहरुख खानच्या अभिनयाचे विशेष कौतुक करण्यात आले होते.
-
२०११ साली प्रदर्शित झालेल्या ‘डॉन २’ने २८० कोटी रुपयांची कमाई केली.
-
२०१२ साली प्रदर्शित झालेल्या ‘जब तक है जान’ या चित्रपटाने जगभरात २११ कोटी रुपयांची कमाई केली होती.
-
‘रा-वन’ या २०११ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २०७ कोटी रुपयांची कमाई केली.
-
२०१८ साली प्रदर्शित झालेल्या ‘झिरो’ या चित्रपटाने जगभरात १९१.४४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. (Photo: Social Media)
Photos: शाहरुख खानचा ‘पठाण’ बॉक्स ऑफिसवर दाखवणार का आपली जादू? ‘या’ चित्रपटांनी परदेशात केली विक्रमी कमाई
‘पठाण’ चित्रपटाबाबत परदेशातही प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर परदेशात बंपर कमाई करणाऱ्या शाहरुख खानच्या टॉप सात चित्रपटांवर एक नजर टाकूया.
Web Title: Will shah rukh khan pathan show its magic at the box office these movies made record money overseas pvp