-
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमला पॉलला मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले.
-
केरळमधील एर्नाकुलम येथील तिरुवैरानिकुलम महादेव मंदिरात अधिकाऱ्यांनी तिला प्रवेश नाकारल्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे.
-
‘धार्मिक भेदभावामुळे तिला मंदिरात प्रवेश दिला नाही असाही आरोप तिने केला आहे.
-
अमला पॉल सोमवारी दर्शनासाठी मंदिरात पोहोचली होती, परंतु मंदिराच्या अधिकाऱ्यांनी तिला प्रवेश नाकारला.
-
प्रथेचे कारण देत अभिनेत्रीला मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आले. तिला सांगण्यात आले की मंदिर परिसरात फक्त हिंदूंनाच प्रवेश आहे.
-
मंदिर प्रशासनाशी संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांनी केवळ मंदिराचे नियम पाळले आहेत.
-
अमाला पॉलचा जन्म ख्रिश्चन कुटुंबात झाला आहे. ती दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मॉडेलिंग ते निर्माती असा तिचा प्रवास आहे.
-
अमला पॉल प्रामुख्याने तमिळ, मल्याळम आणि तेलुगू चित्रपटांमध्ये दिसते. नीलथमारा या मल्याळम चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
-
अमला पॉल ‘रंजीश ही सही’ या हिंदी वेबसीरिजमध्येही दिसली आहे. लवकरच ती अजय देवगणच्या भोला चित्रपटात दिसणार अशी चर्चा आहे. फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस

Viral Video: सावधान! रात्रीच्या वेळी गाडी चालवताय, मग ‘हा’ धक्कादायक व्हिडीओ एकदा पाहाच