-
शाहरुख खानचा ‘पठाण’ अखेर चित्रपटगृहात धडकला आहे आणि प्रेक्षकांनी याला उदंड प्रतिसाद दिलेला आहे.
-
सगळीकडे याचं ऍडव्हान्स बुकिंग अगदी जोरात सुरू होते, शाहरुखचे चाहते तर त्याच्या या चित्रपटाची चातकाप्रमाणे वाट बघत होते.
-
वेगवेगळ्या कारणांमुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यातही अडकला.
-
दीपिकाने परिधान केलेल्या भगव्या बिकिनीने कित्येकांच्या भुवया उंचावल्या. बऱ्याच लोकांनी यावर टीका केली तर काही या चित्रपटाला पाठिंबा दर्शवला.
-
आता मात्र बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट धुमाकूळ घालणार असं चित्र दिसत आहे. पहिल्याच दिवशी हा चित्रपट ५० कोटीपेक्षा जास्त कमाई करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
-
तब्बल ४ वर्षांनी शाहरुख खान या चित्रपटातून पुनरागमन करत आहेत. शाहरुख या चित्रपटात जबरदस्त अॅक्शन करताना दिसत आहे. याबरोबरच शाहरुखने त्याच्या शरीरावरही भरपूर मेहनत घेतल्याचं दिसत आहे. या चित्रपटातील शाहरुखच्या लूकची आणि त्याच्या बॉडीची जबरदस्त चर्चा होत आहे.
-
नुकतंच ‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये शाहरुखच्या जीम ट्रेनर प्रशांत सावंतने शाहरुखच्या बॉडीमागील रहस्य सांगितलं आहे. गेली २२ वर्षं प्रशांत शाहरुखबरोबर काम करत आहे.
-
प्रशांतने ‘ओम शांती ओम’दरम्यानचा किस्सादेखील सांगितला. त्या चित्रपटातही शाहरुख शर्टलेस सीन द्यायला तितका उत्सुक नव्हता, तेव्हा त्याने प्रशांतकडे विनंती किली आणि शाहरुखने त्याला निक्षून सांगितलं की जर त्याची बॉडी नीट झाली नाही तर तो शर्टलेस होणार नाही.
-
प्रशांतच्या म्हणण्याप्रमाणे शाहरुख खानने ‘पठाण’साठी तब्बल २ महीने मेहनत घेतली.
-
सलग १८ महीने शाहरुखने जीममध्ये मेहनत घेतल्याचं प्रशांतने सांगितलं.
-
एवढंच नाही तर कोविडदरम्यान शाहरुख प्रशांतकडून व्हिडिओ कॉलवर सेशन करून घ्यायचा.
-
ट्रेनिंगदरम्यान शाहरुखने त्याच्या आहारात सॅलड, चिकन आणि अंडी यांचा अधिक समावेश केला आणि गोड खाणं पूर्णपणे बंद केलं होतं असं प्रशांतनी सांगितलं. यामुळेच ‘पठाण’मध्ये शाहरुख एवढा फिट आणि जबरदस्त अॅक्शन मोडमध्ये शोभून दिसला आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)

“ बाळासाहेब थोरातांसारख्या नेत्याने अशी बंडाची भूमिका घ्यावी, म्हणजे नक्कीच…” संजय राऊतांचं विधान!