-
२०१७ साली आलेल्या ‘जब हरी मेट सेजल’ हा त्याचा चित्रपट फारसा चालला नाही. इम्तियाज अली दिग्दर्शित या चित्रपटात अनुष्का शर्माची भूमिका होती.
-
‘पठाण’च्या आधी झिरो या चित्रपटात शाहरुख खान झळकला होता. या चित्रपटाच्या ट्रेलरपासून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. या चित्रपटात मोठ्या प्रमाणावर VFX चा वापर होता मात्र चित्रपटाने प्रेक्षकांना निराश केले.
-
‘बिल्लू’ चित्रपट २००९ साली आला होता. या चित्रपटात शाहरुख खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत होता. इरफान खानची मुख्य भूमिका असलेला चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही.
-
राजा अशोकावर ‘अशोका’ हा ऐतिहासिक चित्रपट २००२ साली प्रदर्शित झाला होता. करीना कपूर यात मुख्य भूमिकेत होती मात्र प्रेक्षकांनी चित्रपटाकडे पाठ फिरवली.
-
‘लगान’ चित्रपटाचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा दुसरा चित्रपट ‘स्वदेस’, या चित्रपटाचे समीक्षकांनी कौतुक केले. नासामधील एक शास्त्रज्ञ मायदेशात येतो आणि इकडच्या समस्या बघून इथेच स्थायिक होण्याचा निर्णय घेतो. अशी या चित्रपटाची कथा होती. शाहरुखच्या अभिनयाचे कौतुक झाले खरे मात्र चित्रपटाला यश मिळाले नाही,
-
अभिनेत्री जुही चावला आणि शाहरुखची निर्मिती असलेला ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’ हा चित्रपट माध्यमांवर आधारित होता. मात्र चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही.
-
याच जोडीचा आणखीन एक चित्रपट म्हणजे ‘वन टू का फोर’, हा चित्रपट शशिलाल के. नायर यांनी दिग्दर्शित केला होता, मात्र बॉक्स ऑफिसवर चालला नाही.
-
एक चाहतानंतर डोकेदुखी होऊ शकतो यावर भाष्य करणारा शाहरुख खानचा ‘फॅन’ हा चित्रपट होता. या चित्रपटात शाहरुख खानची दुहेरी भूमिका होती, मात्र हा चित्रपट चालला नाही. यशराज फिल्म्सने चित्रपटाची निर्मिती केली होती.
-
दिग्गज अभिनेते अमोल पालेकर यांचा ‘पहेली’ चित्रपट २००५ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची संकल्पना हटके होती तसेच शाहरुख खान भूमिकेत होता. या चित्रपटात अनेक तगडे कलाकार होते. मात्र हा चित्रपट फ्लॉप ठरला. फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस
