-
बॉलिवूडची डिम्पल गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री म्हणजे प्रीती झिंटा, तिने आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे.
-
प्रीतीने बॉलिवूडमध्ये जशी आपल्या अभिनयातून छाप पाडली तशी ती आपल्या मतावरदेखील ठामपणे उभी होती.
-
प्रीती झिंटाच्या सुरवातीच्या काळात तिने चोरी ‘चोरी चुपके चुपके’ या चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.
-
या चित्रपटात अंडरवर्ल्डचे पैसे असल्याचे आरोप करण्यात आले होते. फक्त नावाला भरत शाह हे निर्माते होते मात्र दोन छोटा शकीलने या चित्रपटात पैसे गुंतवले होते.
-
छोटा शकीलच्या विरोधात बोलण्यासाठी बॉलिवूडमधील कोणताच कलाकार धजावत नव्हता तेव्हा प्रीती झिंटाने कोर्टात जाऊन छोटा शकीलच्या विरोधात साक्ष दिली होती.
-
प्रीतीने साक्ष देण्याआधीच तिला धमक्यांचे फोन आले होते. त्यामुळे ती कोर्टात पोहोचली. अंडरवर्ल्डशी संबंधित प्रकरण असल्याने प्रीतीचा व्हिडीओग्राफीद्वारे जबाब नोंदवण्यात आला.
-
या वक्तव्याच्या आधारे भरत शाह यांना अटक करण्यात आली असून निर्माते नाझिम रिझवी यांनाही या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते.
-
या प्रकरणावर अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितले होते की, “मी खूप घाबरले होते आणि अस्वस्थ होते.”
-
या चित्रपटात सलमान खान, राणी मुखर्जी कलाकार होते. तर अब्बास मस्तान यांनी दिग्दर्शन केले होते. फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
