-
बॉलिवूड कलाकार चित्रपटातील भूमिकेसाठी काहीही करायला तयार असतात. आज आपण अशाच काही बॉलिवूड कलाकारांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी केवळ एका भूमिकेसाठी स्वतःचं वजन वाढवलं. अभिनेत्री क्रीती सनॉन हिने ‘मिमी’ या चित्रपटासाठी वजन वाढवलं होतं. यातील तिच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली.
-
मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणाऱ्या आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला होता. या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी आमिरने प्रचंड वजन वाढवले आणि तितकेच कमीदेखील केले होते. त्याच्या या ट्रान्सफॉर्मेशनची तेव्हा खूपच चर्चा झाली होती.
-
बॉलिवूडमध्ये अभिनयाच्या जोरावर स्वतःचं स्थान निर्माण करणाऱ्या विद्या बालननेसुद्धा ‘द डर्टी पिक्चर’ या चित्रपटासाठी वजन वाढवलं होतं. यात विद्याच्या बोल्ड बिनधास्त भूमिकेचं आणि तिच्या लाजवाब अभिनयाचं खूप कौतुकही झालं.
-
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा त्याच्या पिळदार शरीरयष्टीसाठी ओळखला जातो. सलमाननेसुद्धा ‘सुलतान’ चित्रपटासाठी वजन वाढवलं होतं.
-
पहिल्याच चित्रपटात म्हणजेच ‘दम लगा के हैशा’ या चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या भूमी पेडणेकरने या भूमिकेसाठी वजन वाढवलं होतं. भूमीच्या या हिंमतीचं लोकांनी खूप कौतुक केलं.
-
अभिषेक बच्चन याने ‘बॉब बिसवास’ या चित्रपटातील भूमिकेसाठी वजन वाढवलं. हा चित्रपट विद्या बालनच्या ‘कहानी’ चित्रपटाचा स्पिन ऑफ होता.
-
हृतिक रोशनने ‘सुपर ३०’ या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेतली. भाषा, राहणीमान याबरोबरच त्याने त्याचं वजनही प्रचंड वाढवलं. या चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला.
-
अभिनेत्री निम्रत कौरला ‘एयरलिफ्ट’ आणि ‘लंचबॉक्स’सारख्या चित्रपटांमुळे ओळख मिळाली. अभिषेक बच्चनबरोबरच्या ‘दसवी’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटासाठी निम्रतने वजन वाढवलं होतं.
-
अष्टपैलू कलाकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फरहान अख्तरने ‘तुफान’ या चित्रपटाच्या माध्यमातून ओटीटी विश्वात पदार्पण केलं. हा चित्रपट एका बॉक्सरच्या आयुष्यावर बेतलेला होता, यासाठी फरहानने चांगलंच वजन वाढवलं होतं. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
