-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा आहे.
-
वनिता खरात बॉयफ्रेंड सुमित लोंढेसह मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत सप्तपदी घेणार आहे.
-
या दोघांच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली असून हळदीचा कार्यक्रम नुकताच पार पडला आहे.
-
महाराष्ट्राची हास्यजत्रेतील कलाकारांनी वनिता व सुमितच्या हळदीच्या कार्यक्रमांना हजेरी लावली. या हळदी समारंभाचे फोटो नम्रता संभेरावने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
हळदी समारंभासाठी वनिता व सुमितने खास पांढऱ्या रंगाचा फुलांची डिझाइन असलेला पेहराव केला होता.
-
वनिता खरात आणि सुमित लोंढे यांच्या हळदी समारंभातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
वनिता वरळी येथील कोळीवाड्यात राहते. याच ठिकाणी तिचा हळदी समारंभ मित्रपरिवाराच्या उपस्थितीत पार पडला.
-
या सर्व फोटोंमध्ये वनिता आणि सुमित मित्रांबरोबर खूप धम्माल मस्ती करताना दिसत आहेत.
-
(फोटो सौजन्य- नम्रता संभेराव इन्स्टाग्राम)
