-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात २ फेब्रुवारीला बॉयफ्रेंड सुमित लोंढेसह विवाहबंधनात अडकली.
-
वनिताच्या लग्नाला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.
-
यामध्ये निखिल बनेचाही समावेश होता. यावेळी निखिलनेही काही फोटो सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले.
-
यावेळी वनिताची तसेच निखिलची मैत्रीण आणि ‘चला हवा येऊ द्या फेम’ स्नेहल शिदमही लग्नसोहळ्याला उपस्थित होती.
-
आता वनिताच्या लग्नामध्ये निखिल व स्नेहलने एकत्र फोटो काढला.
-
स्नेहलने हा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करताच या दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगत आहेत.
-
स्नेहलने निखिलच्या हातात हात देत त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत फोटो काढला.
-
या फोटोमध्ये दोघंही आनंदाने हसत आहेत. तर स्नेहल लाजताना दिसत आहे.
-
“पिरतीच्या फडात गं, धरला हात असा, काळीज येंधलं आरल….” असं कॅप्शन स्नेहलने हा फोटो शेअर करताना दिलं.
-
त्यानंतर या दोघांचं सगळेच जण अभिनंदन करत आहेत. शिवाय हे दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. स्नेहलने हा फोटो शेअर करताना #wearejustfriends असंही म्हटलं आहे.
-
श्रेया बुगडेपासून ते नम्रता संभेरावपर्यंत बऱ्याच कलाकार मंडळींनी त्यांच्या या फोटोवर कमेंटही केली आहे. (सर्व फोटो – फेसबुक)
