-
गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाचं वर्षंसुद्धा अक्षय कुमारच्या चित्रपटांसाठी चांगलं नसल्याची चर्चा होताना दिसत आहे.
-
नुकताच प्रदर्शित झालेला अक्षय कुमार आणि इम्रान हाश्मीचा ‘सेल्फी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला आहे. १५० कोटी बजेट असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटल्याने लोकांनी अक्षय कुमारलाच जबाबदार धरलं आहे.
-
२०२१ साली प्रदर्शित झालेला ‘सूर्यवंशी’ हा अक्षय कुमारचा शेवटचा सुपरहीट चित्रपट होता.
-
त्यानंतर प्रदर्शित झालेले अक्षय कुमारचे चित्रपट एका पाठोपाठ एक फ्लॉप ठरले.
-
२०२२ मध्ये ‘द काश्मीर फाइल्स’च्या पाठोपाठच अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’ प्रदर्शित झाला, पण त्यासमोर अक्षय कुमारचा हा चित्रपट टिकूच शकला नाही.
-
‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि अक्षय कुमार या दोघांचे केंद्र सरकारबरोबर चांगले संबंध असूनसुद्धा अक्षयचा चित्रपट फ्लॉप ठरला असा कयास काही लोकांना लावायचा प्रयत्न केला, पण एकूणच ‘द काश्मीर फाइल्स’समोर अक्षय कुमारचा चित्रपट टिकण हे कठीणच होतं.
-
त्यानंतर आलेले ‘सम्राट पृथ्वीराज’ आणि ‘राम सेतु’ हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले, कारण कथा आणि अभिनयाच्या बाबतीत अक्षय कुमार भरपूर कमी पडला असल्याचं प्रेक्षकांनी स्पष्ट केलं.
-
नंतर आलेला ‘रक्षा बंधन’ हा चित्रपट बॉयकॉट ट्रेंडमुळे आपटला. आमिर खानच्या चित्रपटाबरोबरच अक्षय कुमारच्या चित्रपटालाही याचा फटका बसला, शिवाय या चित्रपटाच्या लेखिकेच्या काही जुन्या वादग्रस्त ट्वीटमुळे लोकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली.
-
अशी वेगवेगळी कारणं असली तरी अक्षय कुमारचे चित्रपट सध्या फ्लॉप का ठरत आहेत? यामागचं नेमकं कारण काही तज्ञांनी आणि प्रेक्षकांनी सांगितलं आहे.
-
अक्षय कुमार त्याच्या हातात असलेल्या चित्रपटाला जास्त वेळ देऊ शकत नसल्याने आणि एकावेळी बऱ्याच चित्रपटात तो काम करत असल्याने असं होत असल्याचं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. ४० दिवसांत चित्रपटाचं शूटिंग पूर्ण करणाऱ्या आणि शिस्तप्रिय अशा अक्षय कुमारवर यामुळे बऱ्याचदा टीका होते आणि याचं उत्तरही त्याने दिलं आहे.
-
अक्षय कुमारला यामुळे प्रचंड ट्रोल केलं जात आहे आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सेल्फी’ चित्रपटाच्या अपयशाचं खापरही पुन्हा अक्षय कुमारच्याच माथी फोडलं जाताना आपल्याला बघायला मिळत आहे. खुद्द अक्षयनेही ती जबाबदारी स्वतःवर घेतली आहे.
-
अक्षय कुमारचे चाहते त्याच्या एका सुपरहीट चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत. नुकतंच ‘हेरा फेरी ३’चं चित्रीकरण सुरू झालं आहे त्यामुळे त्या चित्रपटाच्या निमित्ताने अक्षय कुमारचा डंका बॉक्स ऑफिसवर वाजेल अशी आशा त्याचे चाहते नक्कीच बाळगू शकतात. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)
