-
स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेतील किर्तीची भूमिका अभिनेत्री समृद्धी केळकरने साकारली होती.
-
या मालिकेच्या कथानकात नेहमीच विविध ट्विस्ट पाहायला मिळाले होते.
-
समृद्धी एक उत्तम अभिनेत्रीच आहेच मात्र ती एक उत्तम नृत्यांगनादेखील आहे. तिने कथ्थकमध्ये अलंकारची पदवी घेतली आहे.
-
समृद्धीने याआधी ‘लक्ष्मी सदैव मंगलम’ या मालिकेत भूमिका साकारली आहे. तसेच तिने ‘पुढचं पाऊल’ व ‘लेक माझी लाडकी’ या मालिकांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.
-
समृद्धी अभिनयाच्याबरोबरीने तिच्या खासगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत असते. ‘बिग बॉस’ मराठी विजेता अक्षय केळकरबरोबर तिचे नाव जोडले जात आहे. यावरच तिने आता भाष्य केलं आहे.
-
राजश्री मराठीच्या टुडेस स्पेशल या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तेव्हा तिला अक्षय केळकरबरोबरच्या नात्याबद्दल विचारले असता ती म्हणाली,”आमच्याबद्दलचे येणारे व्हिडीओ पाहून कोमात गेले होते. माझ्या नातेवाईकांनी, मित्रांनी, आपल्या सिनेसृष्टीतील लोकांनी आमच्या नात्याबद्दल विचारले होते.
-
ती पुढे म्हणाली, “तो माझा खूप चांगला मित्र आहे. जवळपास ५ वर्ष आम्ही मित्र आहोत. मी त्याची बहीण, बायको अशी कोणीच नाहीये,” अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे.
-
दोघांची नुकतीच ‘’दोन कटिंग’2’ ही शॉर्ट फिल्म प्रदर्शित झाली आहे. तसेच नाखवा या म्युझिक व्हिडीओमध्ये त्यांनी एकत्र काम केलं आहे.
-
दोघे सोशल मीडियावर सक्रीय असतात. नुकतेच अक्षयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दोघांचे रील शेअर केलं होतं. फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
