-
नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची पत्नी आलिया यांच्यादरम्यान गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाद सुरू आहे.
-
दोघेही एकमेकांवर आरोप करत आहेत. आलियाने नवाजुद्दीनचे अफेअर असल्याचेही आरोप केले आहेत.
-
सध्या आपसातील वादामुळे चर्चेत असणाऱ्या आलिया व नवाजुद्दीन यांचं लव्ह मॅरेज होतं. यांची प्रेमकहाणीदेखील खास होती.
-
आलिया सिद्दीकी आणि नवाजुद्दीन सिद्दीकी अनेक वर्षांपासून एकत्र आहेत.
-
या दोघांनी बऱ्याच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लग्न केलं होतं.
-
त्यांच्या लग्नाला जवळपास १४ वर्षे झाली आहे.
-
आलिया सिद्दीकीचं खरं नाव अंजली असून ती हिंदू ब्राह्मण कुटुंबातील आहे.
-
लग्नानंतर तिने तिचं नाव बदलून आलिया सिद्दीकी ठेवलं होतं.
-
नवाजने कधीही त्याचा धर्म आपल्यावर लादला नाही, असं आलिया म्हणते.
-
आलिया आणि नवाज दोघेही एकत्र होते, पण काही कारणाने त्यांचे ब्रेकअप झाले.
-
यानंतर त्याच्या आईने त्याचं लग्न शीबाबरोबर ठरवलं आणि त्यांचं लग्न झालं. मात्र, हे लग्न फार काळ टिकलं नाही आणि दोघांनी घटस्फोट घेतला.
-
शीबाचा भाऊ त्यांच्या लग्नात खलनायक होता, असं नवाजुद्दीनने सांगितलं होतं.
-
शीबापासून घटस्फोट घेतल्यानंतर नवाज आणि आलिया पुन्हा एकत्र आले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
-
लग्नानंतर अंजलीनं तिचं नाव बदलून आलिया ठेवलं, दोघांना एक मुलगा यांनी व एक मुलगी शोरा आहेत.
-
(सर्व फोटो – इंडियन एक्सप्रेस व लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
