-
दिग्दर्शक रोहित शेट्टीचा आज ४९ वा वाढदिवस आहे.
-
रोहित शेट्टी बॉलिवूडमधील यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक आहे. आज कोट्यवधींमध्ये खेळणाऱ्या रोहित शेट्टीचा इथपर्यंतचा प्रवास मात्र एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही.
-
रोहित शेट्टीचे वडील एम बी शेट्टी एक प्रसिद्ध अभिनेते होते. त्यांना फायटर शेट्टी म्हणूनही ओळखलं जायचं.
-
डॉन आणि दिवार या सुपरहिट चित्रपटांच्या अॅक्शनचं दिग्दर्शन एम बी शेट्टी यांनी केलं होतं. त्यांनी अनेक चित्रपटांमध्येही मुख्य व्हिलनसोबत काम केलं आहे.
-
रोहित शेट्टीची आई रत्ना यांनी ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून चित्रपटांमध्ये काम केलं आहे. रोहित शेट्टीच्या आई-वडिलांचं हे दुसरं लग्न होतं.
-
रोहित शेट्टीचे सावत्र भाऊदेखील चित्रपटसृष्टीत आहेत. मात्र ते कोणत्याही प्रकारे आपला रोहित शेट्टी किंवा त्याच्या कुटुंबाशी संबंध नसल्याचं सांगतात.
-
रोहित शेट्टी शाळेत शिकत असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं. यामुळे सर्व काही सुरळीत चाललेलं अचानक बिघडलं.
-
रोहित शेट्टीने एका मुलाखतीत वडिलांच्या निधनानंतर आर्थिक परिस्थिती बिघडल्याचं सांगितलं होतं.
-
पैसे नसल्याने त्यांना आपलं घरही विकावं लागलं होतं. घरात असलेल्या चार गाड्याही त्यांना विकाव्या लागल्या होत्या.
-
सांताक्रूझमधील एका उच्चभ्रू वसाहतीतून रोहित शेट्टी आईसोबत दहिसरला शिफ्ट झाला होता. पण दहिसरमध्ये चांगल्या शाळा नसल्याने रोहित शेट्टीने सांताक्रूझमधील शाळा सोडली नाही.
-
तो रोज दहिसर ते सांताक्रूझ प्रवास करुन शाळेत जात असे. रोहित शेट्टीला शाळेत पोहोचण्यासाठी दीड तास लागायचा.
-
आईच्या पहिल्या लग्नापासून असलेल्या सावत्र बहिणीमुळे रोहित शेट्टी कुकू कोहली यांच्या संपर्कात आला. पण त्यावेळी रोहित शेट्टी फक्त १५ वर्षांचा असल्याने कुकू कोहली यांनी त्याला काम देण्यास नकार दिला.
-
दीड वर्षांनी कुकु कोहली यांनी रोहित शेट्टीला आपल्या प्रोजेक्टमध्ये इंटर्न म्हणून काम करण्याची संधी दिली. त्यावेळी त्याला दिवसला फक्त ३० रुपये मिळत होते. हा प्रोजेक्ट होता अजय देवगणचा पहिला चित्रपट ‘फुल और काँटे’.
-
आर्थिक परिस्थिती कोलमडल्याने एकदा रोहित शेट्टीच्या आईने अमिताभ बच्चन यांच्याकडे मदत मागितली होती. रोहित शेट्टीचे वडील चांगले मित्र असल्याने अमिताभ यांनी काही पैसे देत त्यांची मदत केली होती. यामुळे रोहित शेट्टी नेहमी आपण अमिताभ यांचे ऋणी असल्याचं सांगतो. यामुळे त्याने एका चित्रपटाचं नाव बोल बच्चन ठेवलं होतं.
-
सुहाग चित्रपटासाठी रोहित शेट्टीने असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात त्याने अक्षय कुमारचा बॉडी डबल म्हणूनही काम केलं होतं.
-
अजय देवगण मुख्य भूमिकेत असणाऱ्या अनेक चित्रपटांमध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केल्याने रोहित शेट्टीची त्याच्याशी चांगली मैत्री झाली.
-
रोहित नेहमीच अजय देवगणकडे आपला मोठा भाऊ म्हणून पाहतो.
-
रोहित शेट्टी आता चित्रपटाचं दिग्दर्शन करण्यात उत्सुक होता. पण आपला पहिला चित्रपट अजय देवगणसोबतच असेल असं त्याने ठरवलं होतं.
-
दुसऱ्या भुमिकेसाठी अभिषेक बच्चनची निवड करण्यात आली. पण ‘जमीन’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.
-
यानंतर रोहित शेट्टीने ‘संडे’ या क्राइम थ्रिलर चित्रपटाची तयारी सुरु केली होती. पण त्याचवेळी नीरज व्होरा यांनी रोहित शेट्टीकडे एका चित्रपटाची स्क्रिप्ट आणून दिग्दर्शन करण्यास सांगितलं. सुरुवातीला रोहित शेट्टी आपण फक्त अॅक्शन चित्रपट करण्यास इच्छुक असल्याचं सांगत नकार दिला.
-
पण नीरज व्होरा यांनी विश्वास दाखवत दिग्दर्शन करण्यास सांगितलं. हा चित्रपट होता ‘गोलमाल’.
-
यानंतर आलेला ‘सिंघम’ चित्रपटही बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. ‘गोलमाल’, ‘सिंघम’ आणि ‘बोल बच्चन’ सुपरहिट ठरल्याने रोहित शेट्टी यशस्वी दिग्दर्शकांमध्ये जाऊन बसला.
-
यानंतर शाहरुख खानने रोहित शेट्टीसोबत काम करण्याची इच्छा दर्शवली. पण रोहितने आपण अजय देवगणच्या परवानगीशिवाय सोबत काम करु शकत नाही असं सांगितलं. यानंतर त्याने अजय देवगणला विचारलं असता त्याने तुझी इच्छा असेल त्यांच्यासोबत काम करु शकतो असं सांगितलं. हा चित्रपट होता ‘चेन्नई एक्स्प्रेस’.
-
२०१० ते २०१८ पर्यंत रोहित शेट्टीचे आठ चित्रपट आले. महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांनी १०० कोटींची कमाई केली.
-
रोहित शेट्टीने एकूण १५ पेक्षा जास्त चित्रपटांचं दिग्दर्शन केलं असून यापैकी १० चित्रपटांमध्ये अजय देवगण मुख्य भूमिकेत होता. तर दोन चित्रपट सिम्बा आणि सुर्यवंशी यांच्यात अजय देवगण पाहुणा कलाकार म्हणून दिसला होता.
-
अजय देवगणने आपल्यावर विश्वास ठेवला नसता तर आज आपण यशस्वी नसतो असं रोहित नेहमी सांगतो.
-
एकेकाळी ३० रुपये वाचवण्यासाठी चालत जाणारा रोहित शेट्टी आज पाच ते सहा महागड्या गाड्यांचा मालक आहे. (सर्व फोटो – रोहित शेट्टी इन्स्टाग्राम आणि संग्रहित)
