-
‘आई कुठे काय करते’ ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणून ओळखली जाते.
-
गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत अरुंधतीच्या दुसऱ्या लग्नाची धामधूम सुरु आहे.
-
अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नामुळे मालिकेच्या सेटवर जय्यत तयारीही करण्यात आली होती.
-
नुकतंच अरुंधतीचं लग्न पार पडलं. यानिमित्ताने ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील विशाखा हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीने पोस्ट शेअर केली आहे.
-
अभिनेत्री पूनम चांदोरकर ही या मालिकेत हे पात्र साकारत आहे.
-
पूनमने नुकतंच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
-
यात अरुंधतीच्या दुसऱ्या लग्नाचे काही निवडक क्षण पाहायला मिळत आहे.
-
हे फोटो पोस्ट करताना तिने त्याला हटके कॅप्शन दिले आहे.
-
“मागचा एक महिना फक्त अरुंधती आणि अरुंधती च लग्न…..”
-
“हा एकच विषय सगळ्यांसाठी होता अरुंधती लग्न नक्की करणार का ..तर अरुंधतीला लग्न करण्याची गरज काय आहे ?”
-
“इथपर्यंत सगळ्या चर्चा आणि नुसत्या चर्चा …”
-
“पण या सगळ्यातून फायनली अरुंधती आणि आशुतोष यांचं लग्न संपन्न झालं ..खूप मजा आली..”
-
“आणि एकंदर एक व्यक्ती म्हणून विचार करताना असं वाटलं की फक्त सिरीयल साठी नाही.”
-
“तर वैयक्तिक आयुष्यातही अशा अनेक स्त्रिया आहेत ज्यांना मानाने आणि आनंदाने जगण्याचा अधिकार आहे.”
-
“मग तो अधिकार हिरावून घेणारे आपण कोण हो ना ….”
-
“आणि आजच्या भागात केदार आणि विशाखाचा डान्स कसा वाटला तेही नक्की सांगा..”
-
“अशाच काही आठवणी..”
-
“आई कुठे काय करते “नक्की बघा फक्त आपल्या स्टार प्रवाह वर…,” असे तिने यात म्हटले आहे.
