-
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत प्राजक्ता माळीचे नाव कायमच आघाडीवर असते.
-
तिने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे.
-
प्राजक्ताने आतापर्यंत अनेक मालिका, नाटक, चित्रपटात काम केले आहे.
-
मात्र प्राजक्ताचा सिनेसृष्टीतील प्रवास इतका सोपा नव्हता.
-
एका सर्वसामान्य घरातील मुलगी ते सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री या संघर्षमय प्रवासाबद्दल प्राजक्ता माळीने भाष्य केले.
-
प्राजक्ताने नुकतंच ‘झी युवा सन्मान २०२३’ या कार्यक्रमात हजेरी लावली.
-
या कार्यक्रमात तिने सिनेसृष्टीतील संघर्षाबद्दल स्पष्टपणे उत्तर दिले.
-
“मी ज्यावेळी संघर्ष करत होती त्यावेळी आर्थिक संघर्ष होता.”
-
“मी पुण्याची असल्याने मला स्थलांतर करावं लागणार होतं. तेव्हा मुंबईत एकही नातेवाईक नव्हता.”
-
“मुंबई नवीन होती, कुटुंबाला सोडून राहणं नवं होतं.”
-
“माझी आर्थिक परिस्थिती तितकीशी चांगली नव्हती.”
-
“माझे वडील पोलिसात होते, त्यामुळे इतकेच पैसे आहे, यातच सर्व बसवायचं हे असं वातावरण घरात होतं.”
-
“त्यावेळी लोकल ट्रेन म्हणजे अगदी मुंबई- पुण्याच्या मालगाडीतूनही मी प्रवास केला आहे.”
-
“मुंबईतील सिनेसृष्टीत किंवा सेटवर जे वातावरण आहे.”
-
“चढाओढ, राजकारण, गॉसिप्स, अंतर्गत राजकारण या सर्व गोष्टी आहेत.”
-
“अभिनेत्रींविषयी तर स्पेशली तिला आपण कसं नव्या पद्धतीने छळू शकतो असं सर्व होत असतं.”
-
“या सर्वच बाबतीत संघर्ष होता आणि आताही आहे. आता फक्त झोन बदलला आहे.”
-
“मला वाटतं संघर्ष हा कायम असणार आहे.”
-
“आता फक्त तो आर्थिक राहिलेला नाही. मानसिक किंवा भावनिकदृष्ट्या जास्त आहे.”
-
“यश मिळालं आहे ते टिकवण्यामध्येही तो आहे. हे अव्याहतपणे अगदी मरेपर्यंत चालू राहणार आहे.”
-
“ते कधीही संपणार नाही आणि मी ते स्वीकारलं आहे.”
-
“संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्याचा घटक आहे, हे प्रत्येकाने स्वीकारायला हवं”, असे प्राजक्ता माळीने म्हटले.
-
दरम्यान प्राजक्ता माळी ही लवकरच एका चित्रपटात झळकणार आहे.
-
मात्र याचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

“शिंदे-फडणवीसांची युती फोडायची नाहीतर…”, भावाच्या पक्षप्रवेशानंतर शशिकांत शिंदेंचा इशारा