-
सलमान खान सध्या त्याच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटामुळे आणि लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या धमकीच्या ईमेलमुळे चर्चेत आहे.
-
याचदरम्यान बॉलिवूडचे लोकप्रिय कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांनी सलमानबद्दल एका वेगळ्याच गोष्टीचा खुलासा केला आहे.
-
मुकेश यांनी सलमानच्या साध्या जीवनशैलीबद्दल खुलासा केला आहे.
-
देशाचा सर्वात मोठा सुपरस्टार असूनही सलमान अत्यंत साधं जीवन जगतो.
-
यूट्यूबवरील एका कार्यक्रमात मुकेश यांनी सलमान खानच्या या खास गोष्टीबद्दल खुलासा केला आहे.
-
मुकेश छाबरा यांच्या म्हणण्यानुसार सलमान खान मुंबईतील गॅलक्सि अपार्टमेंटमध्ये वन बीएचके फ्लॅटमध्ये राहतो.
-
इतकंच नाही तर त्याच्या या फ्लॅटमध्ये फक्त एक सोफा, डायनिंग टेबल, जीम आणि आणखी एक छोटी खोली आहे असं मुकेश यांनी स्पष्ट केलं आहे.
-
काही मीडिया रीपोर्टनुसार सलमानची एकूण संपत्ती २८५० कोटी इतकी आहे.
-
एवढा श्रीमंत सुपरस्टार आजही एका छोट्या वन बीएचके फ्लॅटमध्ये का राहतो? असा प्रश्न मुकेश यांना विचारण्यात आला.
-
यावर उत्तर देताना मुकेश म्हणाले, “की तो खूप साधा आहे आणि आधीपासूनच सलमान असाच आहे. मी त्याच्याबरोबर १० वर्षांहून अधिक काळ काम करतोय. तरी त्याच्यात काहीच फरक नाही. तो अगदी सामान्य लोकांसारखं आयुष्य जगतो, कोणत्याही महागड्या ऊंची गोष्टींचा त्याला शौक नाही.”
-
सलमान खानच्या ‘बजरंगी भाइजान’ या चित्रपटाचं कास्टिंगचं काम मुकेश यांनी केलं होतं. तेव्हापासून ते सलमानबरोबर काम करत आहेत.
-
फोटो सौजन्य : सलमान खान / फेसबुक पेज

पोलीस महिलेला बघून तरुणाने मर्यादा ओलांडली; मान धरली, किस केलं आणि… तिने पुढे जे केलं, पाहून व्हाल थक्क