-
अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असते.
-
सारा अली खानचा सोशल मीडियावर बराच मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या इन्स्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत असतात.
-
सारा ही महादेवांची मोठी भक्त आहे.
-
ती अनेकदा विविध मंदिरात जाताना दिसते. यावरुन तिला ट्रोलही केले जाते.
-
नुकतंच साराने या ट्रोलिंगवर भाष्य केले आहे. ‘नवभारत टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत तिने यावर उत्तर दिले.
-
“मी मंदिरात जाते आणि त्यावरुन मला ट्रोल केलं जातं, याचा मला काहीही फरक पडत नाही.”
-
“काही दिवसांपूर्वी मी हिमालयातील एका मंदिरात गेले होते.”
-
“यावरुनही मला ट्रोल करण्यात आले. मला खूप वाईट गोष्टी सुनावण्यात आल्या.”
-
“पण मला यातील कोणत्याही गोष्टींचा फरक पडत नाही.”
-
“मला आता कळून चुकलं आहे की लोकांची कोणती मत ऐकावीत आणि कोणती ऐकू नये.”
-
“जर प्रेक्षकांना माझ्या कामात काही चुकीचं वाटतं असेल, त्यांना काही खटकत असेल तर त्यांनी ते थेट सांगावे.”
-
“कारण त्या गोष्टी भविष्यात माझ्यासाठी धोकादायक असू शकतात.”
-
“मी फक्त माझ्या चाहत्यांसाठी अभिनय करते.”
-
“पण जर कोणाला माझ्या वैयक्तिक गोष्टींबद्दल किंवा माझ्या जीवनशैलीबद्दल अडचण असेल तर मला काही फरक पडत नाही.” असे साराने म्हटले.
-
दरम्यान सारा अली खान ही सध्या ‘गॅसलाइट’ या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे.
-
तिचा हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित केला जाणार आहे.
-
तसेच तिचे ‘ए वतन मेरे वतन’ आणि ‘मर्डर मुबारक’, ‘जगन शक्ति’ आणि ‘लक्ष्मण उतरेकर’ हे चित्रपटदेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
-
तर दुसरीकडे विक्रांत मेस्सी ‘जिगरी यार’, ‘मुंबईकर’,’सेक्टर 36′ आणि फिर आई हसीन दिलरुबा’ सारख्या चित्रपटात ती झळकणार आहे.

अहमदनगरचं नाव ‘अहिल्यादेवी होळकर नगर’ होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा!