-
कॉमेडीचा बादशहा ज्याने ९० च्या दशकात धुमाकूळ घातला होता तो अभिनेता म्हणजे गोविंदा. सध्या बॉलिवूडमध्ये तो फारसा सक्रीय नसला तरी त्याला ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती मात्र नंतर त्याची भूमिका काढून टाकण्यात आली. त्यामुळे यावरून बराच वाद निर्माण झाला होता.
-
स्टार कीड अशी ओळख असलेली अभिनेत्री आलिया भट्ट सातत्याने चर्चेत येत असते. सध्या ती तिचे वैवाहिक आयुष्य एन्जॉय करताना दिसून येते.
-
आज आघाडीची अभिनेत्री अशी जरी तिची ओळख असली तरी तिला सुशांत सिंहच्या ‘राबता’ चित्रपटातून काढले होते. यामागचे कारण आलियाचे व्यस्त शेड्युल असल्याचे सांगितले जात होते. क्रिती सॅनॉनने यामध्ये झळकली होती.
-
आधी दक्षिणेत आता बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे तापसी पन्नू, अनेकदा ती ट्रोल होताना दिसून येते.
-
तापसीकडे आज अनेक चित्रपट जरी असले तरी तिला पति पत्नी और वो’ या चित्रपटातून काढून टाकण्यात आले होते. मात्र यामागचे कारण अद्याप कळले नाही.
-
बॉलिवूडची डिंपल गर्ल अर्थात दीपिका पदुकोण सध्या ‘पठाण’मुळे चर्चेत आहे . तसेच ती आता ‘फायट’र या चित्रपटातदेखील दिसणार आहे.
-
दीपिका पदुकोणलादेखील चित्रपटातून काढून टाकण्यात आले होते त्या चित्रपटाचे नाव आहे ‘बैजू बावरा’, अद्याप चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाले नाही मात्र दीपिकाला यात संधी दिली गेली नाही.
-
बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्यांना मागे टाकत आज सुपरहिट चित्रपट देणारा कार्तिक आर्यनदेखील चर्चेत असतो.
-
कार्तिक करण जोहरबरोबर ‘दोस्ताना २’ या चित्रपटात दिसणार होता. मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिक आणि करणमधील वादामुळे अभिनेत्याला हा चित्रपट गमवावा लागला. फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस

मोलकरणीने लघवीने पुसलं मालकाचं घर, CCTV मुळे झाला खुलासा, पोलिसांना म्हणाली, “मी काम…”