-
बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा ही कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते.
-
बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक म्हणून तिला ओळखले जाते.
-
परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा यांच्या अफेअरच्या चर्चा पाहायला मिळत आहेत.
-
त्या दोघांच्या कुटुंबियांची बोलणीही सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.
-
या चर्चेदरम्यान आम आदमी पक्षाचे खासदार संजीव अरोरा यांनी ट्वीट करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
-
त्यामुळे परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे बोललं जात आहे.
-
काही दिवसांपूर्वी परिणिती चोप्राने तिच्या लग्नाबद्दल एका मुलाखतीत भाष्य केले होते.
-
“काही दिवसांपूर्वी तू तुझ्या आई-वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शअर केली होती.”
-
“तू तुझी बहिण प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांचे लग्न आदर्श लग्न असल्याचे मानतेस, मग तू तुझ्या लग्नाबद्दल का विचार करत नाही?” असा प्रश्न तिला विचारण्यात आला.
-
“तुम्ही तर माझ्या जखमेवर मीठ चोळत आहात.”
-
“मी सध्या दुर्बिण घेऊन मुलाचा शोध घेत आहे.”
-
“माझ्या मते प्रेम ही फार सुंदर गोष्ट आहे.”
-
“जर मला योग्य व्यक्ती सापडला तर मी तुम्हा सर्वांना आनंदाने सांगेन.”
-
“खरं सागांयचे तर मी लग्नासाठी ज्या प्रकारच्या मुलाच्या शोधात आहे त्याचे निकष फारच उच्च आहेत.”
-
“लग्नाबद्दल माझे मत फार वेगळे आहे.”
-
“जोपर्यंत तुम्हाला तुमच्यावर प्रेम करणारी व्यक्ती मिळत नाही, तोपर्यंत तुम्ही लग्न करु नये.”
-
“मग ते तुम्हाला वयाच्या ८० व्या वर्षी जरी मिळाले तरीही..!!”
-
“पण जर तुम्ही काहीही प्रेम नसलेल्या व्यक्तीबरोबर लग्नबंधनात अडकलात तर मात्र त्यापेक्षा वाईट आयुष्य काहीही असू शकत नाही.”
-
“तुम्ही लग्नाच्या वयाचे आहात म्हणून तुम्ही कोणत्याही व्यक्तीशी लग्न करावे हे मला अजिबात पटत नाही.”
-
“जोपर्यंत मी त्या व्यक्तीच्या प्रेमात पडत नाही, त्याच्याबद्दल तुमच्या हृदयात, मनात घंटी वाजत नाही तोपर्यंत मी तरी निश्चित लग्न करणार नाही.”
-
“सध्या मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करावं अशी देवाची इच्छा आहे. मी माझ्या कारकिर्दीच्या एका अतिशय चांगल्या टप्प्यातून जात आहे. याचा मला आनंद आहे”, असे परिणिती स्पष्टीकरण देताना म्हणाली.

स्त्री मनाला लज्जा आणणारी भाषा ते शितल म्हात्रे प्रकरणातील ओरिजनल व्हिडीओ, सुषमा अंधारे-संजय शिरसाट प्रकरण नेमकं काय आहे? वाचा…