-
या अभिनेत्रीने आपल्या फ्लॉप करीअरसाठी बहिण दिव्या भारतीला ठरवले जबाबदार
-
‘ग्रैंड मस्ती’ मधून बॉलिवूडमध्ये पदापर्ण करणारी अभिनेत्री कायनात अरोडा सध्या बॉलिवूडमधून गायब आहे.
-
कायनात दिवंगत अभिनेत्री दिव्या भारतीची बहीण आहे
-
बॉलिवूडध्ये तिचं करिअर जोर धरु शकलं नाही
-
दिव्या भारतीने ९० च्या दशकात एकामागून एक ब्लॉकबस्टर हिट्स देऊन दहशत निर्माण केली होती.पण १९९३ मध्ये दिव्या भारतीचा गूढ मृत्यू झाला.
-
पण जेव्हा कायनात अरोराने चित्रपटांमध्ये पाऊल ठेवले तेव्हा तिला बहिण दिव्या भारतीच्या स्टारडमचा भार जाणवला.
-
उत्तर प्रदेशातील सहारनपूरची राहणारी कायनात अरोराने नेहमीच अभिनेत्री बनण्याचे स्वप्न पाहत असे.
-
कायनातला अभिनेत्री बनण्याची प्रेरणा दिव्या भारतीकडून मिळाली.
-
दिव्या भारतीला पाहिल्यानंतरच कायनातने चित्रपटांमध्ये येण्याचा निर्णय घेतला.
-
अभिनेत्री होण्याचे कायनात अरोराचे स्वप्न २०१३ मध्ये साकार झाले जेव्हा तिला ‘ग्रँड मस्ती’ या चित्रपटात भूमिकेची ऑफर आली.
-
या चित्रपटापूर्वी कायनातने फक्त दोन चित्रपटांमध्ये आयटम साँग केले होते.
-
कायनात अरोराने पदार्पणानंतर अनेक चित्रपटांमध्ये काम केले. बॉलीवूड व्यतिरिक्त, तिने अनेक साऊथ चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.
-
परंतु तिला ना यश मिळाले आणि ना तिला बहिण दिव्या भारतीसारखे स्टारडम मिळू शकले नाही.
-
कायनात अरोराने एकदा दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की दिव्या भारती सारखे प्रसिद्ध नातेवाईक असणे नेहमीच फायदेशीर नसते.
-
मला दिव्या भारतीबद्दल खूप आदर आहे, पण ती माझी बहीण असणं कोणत्याही प्रकारे फायदेशीर ठरलं नाही.
-
कायनात म्हणाली होती, दिव्या भारतीची बहिण बनणे माझ्यासाठी ओझे झाले होते. लोक माझी आणि दिव्याची तुलना करु लागले होते.
-
मला वाटते की दिव्या भारती माझी बहीण नसती तर मी खूप चांगले काम केले असते. कायना अरोरा अजूनही चित्रपटांमध्ये सक्रिय आहे. पण तिला हवा तशी भुमिका मिळाली नाही.
-
ती लवकरच दीपक तिजोरीच्या ‘टिप्सी’ चित्रपटात दिसणार आहे. मात्र त्याची रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. (फोटो इन्स्टाग्राम व संग्रहित)

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचा G20 मधून परतताच मोठा निर्णय, ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का