-
मराठी रंगभूमीवर व्यावसायिक व प्रायोगिक नाटकांमधून अनेक विषय हाताळणाऱ्या आणि प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणाऱ्या नाटकाचा त्यातील कलाकारांचा व तंत्रज्ञाचा गौरव करणारा सोहळा म्हणजे झी नाट्य गौरव पुरस्कार.
-
मराठीनाट्यसृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते अशा प्रतिष्ठित ‘झी नाट्य गौरव’ २०२३ पुरस्कार सोहळा अतिशय उत्साहात पार पडला.
-
या सोहळ्याचे खास आकर्षण ठरलं ते म्हणजे निलेश साबळेने सादर केलेले ‘हसवा फसवी’ मधील प्रवेश.
-
या सोहळ्यात प्रेक्षकांना ‘अश्रूंची झाली फुले’, ‘यंदा कदाचित’, ‘सही रे सही’ आणि ‘चारचौघी’ या गाजत असलेल्या हाऊसफुल्ल नाटकांमधील नाट्यप्रवेश पाहता येणार आहेत.
-
अनेक गोड सरप्राइझेस या नाट्य गौरवच्या निमित्ताने रसिकांना मिळणार आहेत.
-
झी नाट्य गौरव पुरस्काराचं यंदाचं हे २३ वं वर्ष आहे.
-
मराठी नाटक चित्रपटांसाठीच ‘झी मराठी’चं हे समृद्ध नातं सन २००० पासून सुरु झालं होतं.
-
तेव्हा एका तिकिटात अनेक प्रयोग पाहण्याची नामीसंधी रसिक प्रेक्षकांना असणार आहे.
-
नाट्यक्षेत्रात वर्षभर आपल्या कार्याची छाप सोडणाऱ्या आणि विविध प्रयोग करणाऱ्या रंगकर्मींच्या सन्मानाचा हा सोहळा.
-
झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
-
हा सोहळा प्रेक्षकांना ९ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजता झी मराठी वाहिनीवर पाहता येणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : झी मराठी /इन्स्टाग्राम)

राहुल नार्वेकरांच्या क्रांतीकारक निर्णय घेण्याच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणाले, “ते काय…”