-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणून सिद्धार्थ जाधवला ओळखले जाते.
-
आपल्या अभिनयाच्या हटके शैलीने प्रेक्षकांना वेड लावणारा अवलिया कलाकार म्हणून तो घराघरात प्रसिद्ध आहे.
-
सिद्धार्थ जाधव हा सध्या लंडनमध्ये गेला आहे.
-
‘कैरी’ या चित्रपटाच्या शूटींगच्या निमित्ताने तो सध्या लंडनमध्ये आहे.
-
त्यावेळी त्याने त्याच्या बकेट लिस्टमधील आणखी एक इच्छा पूर्ण केली आहे.
-
सिद्धार्थने नुकतीच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन येथील निवासस्थानाला भेट दिली आहे.
-
त्या ठिकाणचे काही खास फोटो सिद्धार्थने शेअर केले आहेत.
-
“माझा भीमराया, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच लंडनमधील घर…” असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले आहे.
-
यावेळी त्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरातील वस्तूंची झलकही दाखवली आहे.
-
या पोस्टमधून त्याने महामानवाला वंदन केलं आहे.
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर लंडनमध्ये शिक्षण घेत असताना ज्या घरात वास्तव्य करत होते तीच ही वास्तू आहे.
-
सिद्धार्थची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (सर्व फोटो- सिद्धार्थ जाधव/ इन्स्टाग्राम)

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल