-
प्रसिद्ध अभिनेता शरत सक्सेना यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांच्या दमदार अभिनयाने त्यांनी लाखो रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अलिकडेच त्यांनी बॉलिवूड सोडून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीकडे मोर्चा वळवला आहे. बॉलिवूड सोडण्याचं कारण नुकतंच त्यांनी लोकांसमोर मांडलं. (Source: @sharat_saxena/instagram)
-
शरत सक्सेना यांनी हिंदीशिवाय मल्याळम, तमिळ, तेलुगू आणि पंजाबी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत असल्याचं सिद्ध केलं आहे. वयाच्या ७२ व्या वर्षीही ते बॉलिवूडमधील सर्वात फिट अभिनेत्यांपैकी एक आहेत. (Source: @sharat_saxena/instagram)
-
शरत सक्सेना यांनी सांगितलं की, बॉलिवूडमध्ये मला आदर मिळत नव्हता. बॉलिवूडमध्ये केवळ फाईट सीन करावे लागत होते. कारण माझा लूक हिरोसारखा नाही असं सांगितलं जायचं. माझ्या चेहऱ्यामुळे कायम नकारात्मक भूमिकाच मिळायच्या. (Source: @sharat_saxena/instagram)
-
शरत म्हणाले, बॉलिवूडमध्ये केवळ हिरोंचे इंट्रोडक्शन सीन असतात. हिरो साहेब येणार आम्हाला चोपणार आणि स्वतःला हिरो घोषित करुन पुढे जाणार. (Source: @sharat_saxena/instagram)
-
शरत म्हणाले, मी बॉलिवूडमध्ये आल्यापासून हेच काम करत आलो आहे. २५ ते ३० वर्ष हेच काम केलं. परंतु मी या कामामुळे थकलो आणि म्हणून मी बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला. (Source: @sharat_saxena/instagram)
-
अभिनेते सक्सेना म्हणाले, मला काहीतरी चांगलं काम करायचं होतं. परंतु नशीबाने माझी साथ सोडली नाही, ही माझ्यासाठी चांगली गोष्ट होती. बॉलिवूडमधून ब्रेक घेतल्यावर मला दक्षिणेकडे चांगलं काम मिळू लागलं. (Source: @sharat_saxena/instagram)
-
शरत सक्सेना हे हिंदी चित्रपटांमध्ये खलनायकी भूमिकांसाठी प्रसिद्ध होते. तर मिस्टर इंडियापासून ते बजरंगी भाईजानपर्यंत अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी सहाय्यक अभिनेत्याची भूमिका वठवली होती. (Source: @sharat_saxena/instagram)
-
शरत सक्सेना मुंबईत त्यांच्या कुटुंबासमवेत राहतात. शरत यंच्या कुटुंबात त्यांची पत्नी शोभा आणि दोन मुलं वीरा आणि विशाल असे एकून तीन जण आहेत. (Source: @sharat_saxena/instagram)

“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट