-
छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’.
-
हिंदी मालिका विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय शो ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ जवळपास १५ वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
-
या मालिकेतील प्रत्येक कलाकरही वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असतो. या मालिकेत सोनूची भूमिका झील मेहताने साकारली होती.
-
माधवी व आत्माराम भिडे यांची एकुलती एक मुलगी सोनू हे पात्र प्रेक्षकांना खूप आवडले.
-
झीलने २००८ पासून ते २०१२ पर्यंत मालिकेमध्ये काम केले. यानंतर शिक्षणावर लक्षकेंद्रीत करण्यासाठी झीलने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता.
-
यानंतर निधी भानुशालीने सोनू हे पात्र साकारण्यास सुरुवात केली. निधीनंतर आता पलक संधिवाणी सोनूची भूमिका बजावत आहे.
-
तारक मेहतामध्ये गेल्या काही दिवसांपासून सोनू आणि टपूच्या प्रेमकथेचा ट्रेक सुरू आहे.
-
असे असतानाच, जुन्या सोनू म्हणजेच झीलच्या खऱ्या आयुष्यातही एका खास माणसाची एंट्री झाली आहे. यासंबंधीचा एक लव्ही-डवी व्हिडीओ झीलने एप्रिल महिन्यात शेअर केला होता.
-
व्हिडीओमध्ये ती खास व्यक्तीसोबत पोज देताना दिसत आहे. या कॅप्शनमध्ये त्याने हार्ट शेप्ड आणि इव्हिल आय इमोजी दिले आहेत.
-
मात्र, झीलने अद्याप तिच्या आयुष्यातील खास व्यक्तीबद्दल फारसे काही शेअर केलेले नाही.
-
झील मेहताच्या ट्रान्सफॉर्मेशनबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या काही वर्षांत झील खूप बदलली आहे. ती खूप सुंदर दिसते.
-
तिचा फॅशनसेन्सही अप्रतिम आहे. झील सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिला प्रवासाची खूप आवड असल्याचे तिच्या इन्स्टाग्रामवरून स्पष्ट झाले आहे. (Photos: Instagram)

“आम्हाला वाचवण्याच्या ऐवजी बाउंसर…” गौतमी पाटीलनं सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “ती भीतीदायक परिस्थिती…”