-
स्टार प्रवाहवर सुरु होतंय गाण्याचं दुसरं पर्व अर्थातच ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’.
-
पहिल्या पर्वाला मिळाल्या उदंड प्रतिसादानंतर आता नवे छोटे उस्ताद सुरांची मैफल घेऊन सज्ज झालेत.
-
१० जूनपासून शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता स्टार प्रवाहवर लहानग्यांच्या सुरांची मैफल अनुभवता येणार आहे.
-
सुप्रसिद्ध अभिनेत्री वैदेही परशुरामी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे.
-
सूत्रसंचालनाच्या अनुभवाविषयी सांगताना वैदेही म्हणाली, एका सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने मी ‘छोटे उस्ताद’च्या पहिल्या पर्वात सहभागी झाले होते.
-
या मंचावरचं टॅलेण्ट पाहून मी भारावून गेले होते.
-
इतका भरभरुन प्रतिसाद पहिल्या पर्वाला मिळाला.
-
याच प्रेमापोटी दुसऱ्या पर्वाची घोषणा झाली आहे.
-
दुसऱ्या पर्वाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी माझ्यावर आहे.
-
ज्या पद्धतीचं टॅलेण्ट या मंचावर आहे ते पाहून अवाक व्हायला होतं.
-
इतक्या लहान वयात एवढा आत्मविश्वास पाहून खरंच मी भारावले आहे.
-
सूत्रसंचालन नक्कीच आव्हानात्मक आहे कारण इथे प्रसंगावधान राखावं लागतं.
-
लहान मुलांबरोबर जमवून घेणं आणि त्यांची काळजी घेणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं.
-
मला लहान मुलं प्रचंड आवडतात त्यामुळे या कार्यक्रमाची खूप उत्सुकता आहे.
-
मला खूप गोष्टी शिकायला मिळणार आहेत.
-
मी नेहमीच वेगवेगळे लूक्स आणि स्टाईल ट्राय करण्याचा प्रयत्न करत असते.
-
या कार्यक्रमाच्या निमित्ताने नवनवे लूक्स करण्याची संधी मिळणार आहे.
-
माझ्या सूत्रसंचालनाची सुरुवात स्टार प्रवाहमुळेच झाली.
-
प्रवाह पिक्चर पुरस्कार सोहळा मी पहिल्यांदा होस्ट केला होता.
-
सूत्रसंचालन ही कला आहे. स्टार प्रवाहने माझ्यातला हा पैलू मला शोधून दिल्याबद्दल मी आभारी आहे अशी भावना वैदेहीने व्यक्त केली.
-
(सर्व फोटो सौजन्य : वैदेही परशुरामी/इन्स्टाग्राम)

लग्नाच्या हॉलमध्ये भीषण आग, वधू-वरासह १०० जणांचा होरपळून मृत्यू, १५० हून अधिक जखमी