-
आर माधवनचा आज 53 वा वाढदिवस आहे. गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ आर माधवन सिनेक्षेत्रात आहे. परंतु, त्याला त्याचा मुलगा वेदांत याची कामगिरी फार मोलाची वाटते. नुकत्याच एका मुलाखतीत तो असं म्हणाला होता. (फोटो: आर माधवन/इन्स्टाग्राम)
-
आर माधवनचा मुलगा वेदांत हा राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू आहे आणि तो ऑलिम्पिकसाठी तयारी करत आहे. (फोटो: आर माधवन/इन्स्टाग्राम)
-
रेहना है तेरे दिल में फेम अभिनेता आर. माधवन त्याच्या मुलाला आणि त्याच्या पत्नीला देवाचे ‘सर्वश्रेष्ठ आशीर्वाद’ मानतो. (फोटो: आर माधवन/इन्स्टाग्राम)
-
“प्रत्येक दिवशी मी परमेश्वराचे आभार मानतो की तो माझ्या जीवनात आहे. त्याने देशाला दिलेला गौरव माझ्यासाठी माझ्या स्वत:च्या कारकिर्दीत केलेल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त आहे,” माधवनने ETimes ला दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलं होतं. (फोटो: आर माधवन/इन्स्टाग्राम)
-
माधवन आणि त्याची पत्नी सरिता बिर्जे माधवन दोघेही त्यांचा मुलगा वेदांतचे फोटो शेअर करत असतात. (फोटो: आर माधवन/इन्स्टाग्राम)
-
आर माधवनच्या मुलाने अभिनय क्षेत्रात न येण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा हा निर्णय आर. माधवनला मान्य आहेत. त्याने घेतलेल्या निर्णयाचा अजिबात पश्चाताप नसल्याचेही तो म्हणाला. (फोटो: आर माधवन/इन्स्टाग्राम)
-
पालक म्हणून आम्हाला माहिती आहे की तो काय करतोय. “तो जगभरातील जलतरण स्पर्धा जिंकत आहे आणि आम्हाला खूप अभिमान वाटतो”, असं आर माधवन म्हणतो. (फोटो: आर माधवन/इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्याने सर्व स्टार-पालकांसाठी सल्ला दिला होता. त्याने सांगितले होते की त्यांनी आपल्या मुलांना उडू द्यावे. (फोटो: आर माधवन/इन्स्टाग्राम)

शेंगदाण्याची चिक्की खायला आवडते का? फॅक्टरीमधील व्हायरल व्हिडीओ पाहून चिक्की खाण्यापूर्वी १०० वेळा विचार कराल