-
+आपल्या लाजवाब अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारा हरहुन्नरी अभिनेता अर्शद वारसी हा त्याच्या ‘असुर २’ या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे.
-
२०२० साली लॉकडाउनच्या दरम्यान ‘असुर’ या वेबसीरिजचा पहिला सीझन आला होता आणि प्रेक्षकांनी तो अक्षरशः डोक्यावर घेतला. तेव्हापासून याच्या दुसऱ्या सीझनची लोक आतुरतेने वाट बघत आहेत, अखेर जून २०२३ मध्ये याचा दूसरा सीझन नुकताच ‘जिओ सिनेमा’वर प्रदर्शित झाला आहे.
-
अर्शद वारसीने त्याच्या लाजवाब अभिनयाने सगळ्यांनाच भुरळ घातली आहे. आज चित्रपट आणि ओटीटी अशा दोन्ही माध्यमातून प्रेक्षकांवर स्वतःची छाप सोडणाऱ्या अर्शद वारसीचा प्रवास अन् त्याची एकूण संपत्ती किती याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
-
अर्शदचा जन्म मुंबईच्या एका मुस्लिम कुटुंबात झाला. त्याचे वडील अहमद अली खान यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत म्युझिशियन म्हणून काम केलं होतं. नंतर त्यांनी सूफी संत वारिस अली शाह यांचं शिष्यत्व पत्करलं आणि त्यानंतरच त्यांनी वारसी हे आडनाव आपल्या नावाबरोबर जोडलं.
-
वयाच्या १४ व्या वर्षी अर्शदच्या डोक्यावरचं छप्पर गेलं आणि तो अनाथ झाला. नंतर मुंबईत आयुष्य घालवण्यासाठी त्याने बरेच कष्ट सोसले. दैनंदिन जीवनातील संघर्ष इतका वाढला की अर्शदला १० वी नंतर शिक्षणही सोडावं लागलं.
-
आर्थिक समस्येतून मार्ग काढण्यासाठी लहान वयातच अर्शदला घरोघरी जाऊन वेगवेगळ्या वस्तू विकाव्या लागल्या. यानंतर त्याने एका फोटो लॅबमध्ये काम सुरू केलं आणि यादरम्यानच त्याला नृत्यामध्ये रुची निर्माण झाली अन् त्याला अकबर सामी यांच्या डान्स ग्रुपमध्ये सहभागी व्हायची संधी मिळाली.
-
‘रूप की रानी चोरों का राजा’ या चित्रपटात अनिल कपूर आणि श्रीदेवीसाठी कोरिओग्राफीदेखील अर्शदनेच केली आहे.
-
अर्शदला अभिनयाची आवड सुरुवातीपासूनच नव्हती, ही गोष्ट फार अचानक आणि नशिबाने घडल्याचं अर्शदने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. अमिताभ बच्चन यांची निर्मिती संस्था ABCL च्या ‘तेरे मेरे सपने’ या चित्रपटातून अर्शद वारसीच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात झाली.
-
अर्शदने ‘हासिल’, ‘गोलमाल सीरिज’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘जॉली एलएलबी’अशा वेगवेगळ्या चित्रपटात काम केलं आहे.
-
त्याला खरी ओळख ही ‘मुन्नाभाई एमबीबीएस’च्या सर्किट या पात्रामुळे मिळाली अन् त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलंच नाही.
-
अर्शद बॉलिवूडच्या काही श्रीमंत स्टार्सपैकी एक आहे. त्याने अभिनय आणि ब्रँड प्रमोशन यातून चांगली कमाई केली आहे. मीडिया रीपोर्टनुसार अर्शदची एकूण संपत्ती ३२५ कोटींहून अधिक असल्याचं स्पष्ट झालं आहे.
-
याबरोबरच मुंबईत अर्शदचं एक आलिशान घर आहे. याबरोबरच त्याला लक्झरी कार्सची प्रचंड आवड आहे. त्याच्या कार कलेक्शनमध्ये ८० लाखांची ऑडी क्यू ७, ३० लाखांची वॉक्सवॅगन बॅटल आणि २१ लाखांची हार्ले डेविडसन बाइक यांचा समावेश आहे. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस आणि सोशल मीडिया)

बारामतीत सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार निवडणूक लढणार? रोहित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…