-
सर्वसामान्य लोकांप्रमाणे मालिकाविश्वातील कलाकारसुद्धा आपल्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढत उन्हाळाच्या सुट्ट्यांमध्ये गावची वाट धरतात.
-
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत खलनायिका शालिनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री माधवी निमकरसुद्धा शूटिंगमधून ब्रेक घेत कोकणात पोहोचली आहे.
-
माधवीने कोकण ट्रिपचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
माधवी निमकर सध्या तिच्या आजोळी गुहागरमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
-
माधवीने आपल्या कुटुंबियांबरोबर गुहागरच्या लाईट हाऊसला भेट दिली.
-
गुहागरमधील लाईट हाऊसच्या फोटोंना कॅप्शन देत माधवीने #birthplace असा उल्लेख केला आहे.
-
गावी गेल्यावर माधवीने गुहागरमधील प्रसिद्ध मंदिरे भेट देऊन समुद्र किनाऱ्यावर फोटोशूट केले आहे.
-
काही दिवसांपूर्वी माधवीने फणस सोलतानाचा फोटो शेअर केला होता.
-
माधवीच्या कोकणातील फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षावर केला आहे.

शेंगदाण्याची चिक्की खायला आवडते का? फॅक्टरीमधील व्हायरल व्हिडीओ पाहून चिक्की खाण्यापूर्वी १०० वेळा विचार कराल