-
फेसबुक, इंस्टाग्राम किंवा यूट्यूबवर रील्स पाहताना आपल्या न्यूजफीडमध्ये चिकन लेग पीस चवीने खाणाऱ्या या अवलियाचा व्हिडीओ डोळ्यासमोर आलाच असेल.
-
या सोशल मीडिया स्टारचं नाव आहे उल्हास कामठे. इंटरनेटवर यांना ‘चिकन लेग पीस’ या नावाने ओळखलं जातं. मांसाहारी पदार्थांवर ताव मारणाऱ्या आणि खासकरून चिकन लेग पीसचा आस्वाद घेणाऱ्या उल्हास कामठे यांची खास स्टाईल ही प्रचंड लोकप्रिय झाली आहे.
-
हातात विविध अंगठ्या, कडं, ब्रेसलेट, गळ्यात भरपूर चेन्स आणि डोळ्यांवर मोठा गॉगल अशा अवतारात उल्हास यांचे बरेच व्हिडीओ व्हायर झाले आहेत. मुख्यत्वे उल्हास हे एक फूड ब्लॉगर आहेत. त्यांच्या या खाण्याच्या खास स्टाईलचे प्रचंड चाहते आहेत.
-
वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये नवीन पदार्थ टेस्ट करण्यासाठी उल्हास यांना बोलावलं जातं. त्यांच्या या रील्समुळे ते चांगलेच प्रसिद्ध झाले आहेत.
-
उल्हास यांचा हा सोशल मीडियावरील फूड व्लॉगिंगचा प्रवास नेमका कसा सुरू झाला ते आपण जाणून घेऊया
-
४३ वर्षांचे उल्हास कामठे यांचा जन्म १० जुलै १९८० साली मुंबईत झाला अन् त्यांचं शिक्षण मुंबईमध्येच झालं.
-
उल्हास हे मुंबईत एक जीम चालवतात, शिवाय त्यांनी सर्वप्रथम टिकटॉकच्या माध्यमातून काही डान्स व्हिडीओज शेअर करायला सुरुवात केली.
-
त्या व्हिडीओजना एवढा खास प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी फूड व्लॉग करायला सुरुवात केली अन् यामुळे त्यांना लोकप्रियता मिळाली.
-
आपण खात असलेल्या प्रत्येक गोष्टीचा ते व्हिडीओ शेअर करत असत आणि खासकरून त्यांचं ‘चिकन लेग पीस’ हे एका हटके स्टाईलमध्ये बोलणं याने नेटकऱ्यांना वेड लावलं.
-
टिकटॉकवर बंदी आल्यानंतर मात्र त्यांचे फॅन फॉलोइंग कमी झाले, त्यावेळी हे बऱ्याच सोशल मीडिया स्टार्सच्या बाबतीत घडले.
-
घाटकोपरमध्ये उल्हास यांनी ‘चिकन लेग पीस’ या नावाने नॉन-व्हेज लव्हर्ससाठी एक खास रेस्टोरंटही सुरू केलं आहे.
-
टिकटॉकनंतर उल्हास यांनी फेसबुक आणि इंस्टाग्रामकडे त्यांचा मोर्चा वळवला.
-
काही मीडिया रीपोर्टनुसार व्हिडीओजमधून आणि सोशल मीडिया पार्टनरशीपमधून उल्हास महिन्याला ३ ते ४ लाख कमावतात.
-
आज या दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांचे प्रचंड चाहते आहेत. इंस्टाग्रामवर त्यांचे २ मिलियन फॉलोअर्स आहेत.
-
उल्हास यांची दखल IMDb सारख्या वेबसाईटनेही घेतली आहे. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

शेंगदाण्याची चिक्की खायला आवडते का? फॅक्टरीमधील व्हायरल व्हिडीओ पाहून चिक्की खाण्यापूर्वी १०० वेळा विचार कराल