-
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम पृथ्वीक प्रतापने अलीकडेच स्वराज युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत आपल्याबरोअबर जातीवरून भेदभाव झाल्याची खंत बोलून दाखवली आहे.
-
आज घराघरात पोहोचलेल्या पृथ्वीकला कॉलेजमध्ये असताना जातीमुळे चक्क पाच मुलींनी नकार दिला होता. याविषयी तो सांगतो की, ” ‘तुम्ही जेव्हा कुलकर्णी, शिंदे, पाटील अशी आडनावं सांगता त्यावरून लगेचच तुम्हाला जज केलं जातं की तुम्ही कोणत्या जातीचे आहात.”
-
पृथ्वीक पुढे म्हणाला की, “मी लहानपणापासून खूप जवळच्या मित्रांना यामधून जाताना पाहिलं आहे तो त्रास मला सहन होत नाही. आडनाव पाहून एका विशिष्ट चौकटीत तुम्हाला अडकवलं जातं. मला माझ्या जातीबद्दल कमीपणा वाटतो असं मुळीच नाही. सगळ्यांना त्याचा आदर आहे. पण आडनाव जर काढून टाकलं तर तुम्ही त्या व्यक्तीला माणूस म्हणून ट्रीट करता”
-
आपल्याला फक्त नावावरूनच का ओळखले जाऊ नये असा प्रश्न करत पुढे पृथ्वीकने, “आडनाव सांगितलं की लगेचच तुम्ही त्याची जात शोधायला लागता” अशी खंत व्यक्त केली.
-
आपल्यारिलेशनविषयी सांगताना पृथ्वीक म्हणतो की, ‘माझे पाच ब्रेकअप तर याच कारणामुळे झालेले आहेत. तिघी जणींनी तर मला जातीवरून रिजेक्ट केलं आहे.”
-
“चौथी माझी गर्लफ्रेंड होती. तिचे आईबाबा आजही माझ्याशी तेवढ्याच आपुलकीने बोलतात, मला त्यांच्या घरी बोलावतात, खाऊ घालतात. सगळं काही छान होतं पण नंतर नंतर तिने माझ्या कामावर, माझ्या पगारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. नकार द्यायचा म्हणून ती कारणं शोधत होती. पण मग शेवटी तिने आपली जात एक नाही म्हणून नकार दिला.”
-
“मला कोणत्याही जातीबद्दल कधीच आक्षेप नाही. ज्या त्या जातीला सन्मान मिळायलाच हवा. पण मग तुम्ही आडनावावरून त्या व्यक्तीची तुलना करता.”
-
पृथ्वीक प्रतापचे मूळ आडनाव कांबळे आहे, यावर तो म्हणाला की, “मी ‘कांबळे’ नसतो ‘कुलकर्णी’ असतो तरीही मी माझं आडनाव लावलं नसतं. फक्त नावावरून तुम्ही माणूस म्हणून ओळखलं जावं एवढीच माझी इच्छा आहे.”
-
(सर्व फोटो: इंस्टाग्राम/@PruthvikPratap)
लग्नाच्या हॉलमध्ये भीषण आग, वधू-वरासह १०० जणांचा होरपळून मृत्यू, १५० हून अधिक जखमी