-
‘प्यार का पंचनामा’ फेम अभिनेत्री सोनाली सेहगल विवाहबंधनात अडकली आहे. तिने बॉयफ्रेण्ड व्यावसायिक आशीष सजनानीशी लग्न केलं. (Instagram)
-
लग्नाचे फोटो शेअर करताना, सोनालीने लिहिले, “सब्र आणि शुक्र ?? ਸਬਰ ਸੁਕਰ.” (Instagram)
-
यावेळी सोनालीने गुलाबी रंगाची सुंदर साडी परिधान केली होती. तर आशीषने पांढऱ्या रंगाची शेरवाणी घातली होती. दोघेही अतिशय सुंदर दिसत होते. (Instagram)
-
मित्रपरिवाराने सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट करून या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत. (सोशल मीडिया)
-
याच दरम्यान, हे लग्न ‘प्यार का पंचनामा’ टीमचे पुनर्मिलन ठरले. चित्रपट निर्माते लव रंजन, अभिनेता कार्तिक आर्यन आणि सनी सिंग यानी सोनालीच्या लग्नाला हजेरी लावली होती. (फोटो: वरिंदर चावला)
-
(फोटो: वरिंदर चावला)
-
याआधी, मेहंदी कलाकार वीणा नागदा यांनी सोनाली सेगलच्या मेहंदी सोहळ्यातील फोटो शेअर केले होते. (फोटो: वीणा नागडा/इन्स्टाग्राम)
-
दरम्यान, सोनालीला चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या, पण अनेकांनी कमेंट्स करूत तिला ट्रोल करायला सुरुवात केली. सोनालीचा नवरा तिच्यासमोर खूप वयस्कर वाटतो, असं म्हणत नेटकऱ्यांनी दोघांना ट्रोल करायला सुरुवात केली. (फोटो: वरिंदर चावला)
-
“हा तिचा नवरा कमी आणि तिचे वडीलच जास्त वाटतोय.” असं एकाने लिहिलं. तर आणखी एक जण म्हणाला, “हे चांगलं आहे.. आधी तरुण मुलांना डेट करायचं आणि मग वयस्कर व्यक्तीशी लग्न करून भविष्य सुरक्षित करायचं.” आता सोनाली या फोटोंमुळे चांगलीच चर्चेत आहे. (फोटो: वरिंदर चावला)
भारतावर आरोप करणाऱ्या कॅनडाला द्वीपक्षीय करारांची चिंता; संरक्षणमंत्री म्हणतात; “जर आरोप सिद्ध झाले…!”