-
‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे.
-
महिलांसाठी तर अरुंधती एक आयडॉल झाली आहे.
-
अशी ही लोकप्रिय अरुंधती म्हणजे अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
-
कधी सोशल मीडियावरील पोस्टमुळे तर कधी परखड मतांमुळे.
-
सध्या मधुराणीची मुलगी म्हणजे स्वरालीच्या शाळेबाबत चांगलीच चर्चा रंगली आहे.
-
अलीकडेच ‘हंच मीडिया’ या एंटरटेन्मेंट यूट्युब चॅनेलशी संवाद साधताना मधुराणीनं आपल्या लेकीची शाळा इतर शाळांपेक्षा कशी वेगळी आहे हे सांगितलं.
-
मधुराणी म्हणाली की, “माझ्या मुलीची पुण्यात वेगळ्या प्रकारची शाळा आहे. ती ज्या पद्धतीच्या शाळेत आहे, तशी शाळा मुंबईत मिळाली, तर मी तिला ताबडतोब मुंबईला घेऊन येईन.”
-
पुढे मधुराणी म्हणाली की, “तिच्या शाळेला कुठलाही बोर्ड नाही, अभ्यासक्रम नाही, इयत्ता नाही, वर्ग नाही, बेंचेस नाही, गणवेश नाही, अशा पद्धतीची तिची शाळा आहे.”
-
‘गोकुळ’ असं त्या शाळेचं नाव असून डॉ. ज्योत्स्ना पेठकर या शाळेच्या संचालिका आहेत, असं मधुराणी म्हणाली.
-
“माझ्या मुलीची जी जडणघडण आहे, तिचा जो स्वभाव आहे. त्याला अनुरुप अशी ही शाळा असल्याचं,” यावेळी मधुराणीनं सांगितलं.
-
काही महिन्यांपूर्वी मधुराणी आपल्या मुलीच्या शाळेत कविता शिकवायला गेली होती.
-
याचा व्हिडीओ मधुराणीनं तिच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला होता.
“संभ्रम निर्माण करणारा संदेश…”, अमोल कोल्हेंच्या गंभीर आरोपांवर वाहतूक पोलिसांनी दिलं प्रत्युत्तर