-
‘दिल दोस्ती दुनियादारी’ फेम अभिनेत्री स्वानंदी टिकेकर सध्या चांगलीच चर्चेत आहे.
-
स्वानंदीने काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध गायक आशिष कुलकर्णीसह थाटामाटात साखरपुडा केला.
-
स्वानंदीचा होणारा नवरा आशिष कुलकर्णी हा उत्तम गायक आणि गीतकार आहे. लवकरच ते विवाहबंधनात अडकणार आहे.
-
सध्या दोघेही आफ्रिकेतील केनिया येथे फिरायला गेले आहेत.
-
स्वानंदीने या ट्रिपचे बरेच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
स्वानंदी आणि आशिष पहिल्यांदाच भारताबाहेर एकत्र फिरायला गेले आहेत.
-
“केनिया… आमची पहिली एकत्र ट्रिप “असं कॅप्शन अभिनेत्रीने या फोटोंना दिलं आहे.
-
स्वानंदीने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
-
दरम्यान, येत्या वर्षाखेरिस ही जोडी विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे. ( सर्व फोटो सौजन्य : स्वानंदी टिकेकर इन्स्टाग्राम )

चंद्रशेखर बावनकुळे समोर येताच उद्धव ठाकरेंनी अशी कोपरखळी मारली की सगळ्यांनाच हसू अनावर