-
सध्या भारतीय प्रेक्षक चित्रपट आणि वेब सीरिजच्या बाबतीत चांगलेच चोखंदळ झाले आहेत. बरेच ओटीटी प्लॅटफॉर्म समोर असल्याने लोकांसमोर बरेच पर्याय उपलब्ध झाले आहेत.
-
यापैकी कोरियन थ्रिलर सीरिज आणि चित्रपट पाहणारा प्रेक्षकवर्ग मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. प्रेक्षक या कोरियन सीरिज अत्यंत आवडीने पाहतात.
-
आज आपण अशाच काही काळजाचा थरकाप उडवणाऱ्या व थक्क करणाऱ्या अशा कोरियन थ्रिलर सीरिजबद्दल जाणून घेणार आहोत.
-
बियॉन्ड एविल : ही वेबसीरिज २०२१ मध्ये प्रदर्शित झाली. आपल्याच बहिणीच्या खुनाच्या प्रकरणात अडकलेल्या एका मुलीची ही कहाणी आहे, जेव्हा ती मुलगी यातून बाहेर पडण्यासाठी एका गुप्तहेराची मदत घेते तेव्हा तिच्यासमोर या जगातील बऱ्याच भयानक गोष्टी उलगडायला सुरुवात होते. माणसं ही किती क्रूर होऊ शकतात याचं चित्रण तुम्हाला या सीरिजमध्ये पाहायला मिळेल. ही सीरिज नेटफ्लिक्स व प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे.
-
द ग्लोरी : नेटफ्लिक्सवरील ही २०२२ मधील सर्वात लोकप्रिय कोरियन सीरिज आहे. शाळेतील एका मुलीला श्रीमंत घरातील मुलांनी प्रचंड त्रास दिलेला असतो, या सगळ्याचा बदला घेण्यासाठी ती एक सापळा रचते अन यात तिला तिचे शिक्षक कसे मदत करतात अन् ही थरारनाट्य नेमकं कुठे संपतं हे जाणून घेण्यासाठी तुम्ही ही सीरिज नक्कीच बघू शकता.
-
फ्लावर ऑफ एविल : कोरियन थ्रिलर ड्रामामधील ही सर्वात महत्त्वाची सीरिज आहे. एका जोडप्याची थक्क करणारी कहाणी अन् त्यांच्या पूर्वायुष्यातील काही घटना त्यांचा वर्तमानकाळ कसा बिघडवतात हे आपल्याला या सीरिजमध्ये पाहायला मिळतं. ही सीरिज जिओ सिनेमा तसेच नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.
-
द स्ट्रेंजर : द न्यूयॉर्क टाइम्सने या सीरिजला वर्षातील सर्वोत्कृष्ट टेलिव्हिजन शो म्हणून घोषित केले आहे. एका सर्जरीमुळे एका वकिलाच्या आयुष्यात होणारे बदल अन् यातून समोर येणारं नाट्य व थरार तुम्ही नेटफ्लिक्सवर अनुभवू शकता.
-
माय नेम : आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी मुलगी एका गुंडांच्या टोळीत सामील होते. त्यानंतर ड्रग माफियाशी त्यांचा संबंध आणि एकूणच कथानकातील ट्विस्ट आणि टर्नचा थरार तुम्हाला या सीरिजमध्ये अनुभवायला मिळेल. ही सीरिजही नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.
-
ऑल ऑफ अस आर डेड : संपूर्ण शहरावर झोंबीने हल्ला केला आहे, एका विशिष्ट व्हायरसमुळे लोक झोंबी बनू लागले आहेत. अशातच त्या शहरातील एका मोठ्या शाळेतील काही विद्यार्थ्यांचा या सगळ्यापासून स्वतःला वाचवण्याचा संघर्ष अन् त्यादरम्यानचा थरार तुम्हाला या सीरिजमध्ये पाहायला मिळेल. ही सीरिजही नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य : आयएमडीबी व सोशल मीडिया)

चंद्रशेखर बावनकुळे समोर येताच उद्धव ठाकरेंनी अशी कोपरखळी मारली की सगळ्यांनाच हसू अनावर