-
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि ‘आप’चे नेते राघव चड्ढा यांचा विवाहसोहळा काल म्हणजेच २५ सप्टेंबरला उदयपूरमधील ‘द लीला पॅलेस’मध्ये पार पडला.
-
अनेक सेलेब्रिटी आणि मान्यवरांनी परिणीती आणि राघव यांच्या लग्नाला उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या. लग्नानंतर परिणीतीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर लग्नातील फोटो शेअर केले आहेत.
-
यानंतर परिणीतीने लग्नात घातलेला लेहेंगा चर्चेत आला आहे. परिणीतीचा हा लेहेंगा प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाईन केला आहे. आज आपण या लेहेंग्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊया.
-
असे सांगितले जात आहे की मनीष मल्होत्राला परिणीतीचा हा लेहेंगा तयार करण्यासाठी तब्बल २५०० तासांचा कालावधी लागला. अनोख्या शैलीमध्ये त्याने आपल्या संपूर्ण टिमसह हा लेहेंगा बनवला आहे.
-
परिणीतीसाठी हा लेहेंगा अतिशय खास आहे. यामधील टोनल इक्रू बेस हाताने भरतकाम करून तयार करण्यात आला असून यात जुन्या सोन्याच्या धाग्यांचा वापर करण्यात आला आहे.
-
लेहेंग्यात नक्षी आणि मेटल सिक्विनचे कामही करण्यात आले आहे. हे नेट आणि ट्यूल फ्रेमवर्क असलेल्या ओढणीशी मिळते जुळते आहे.
-
परिणीती चोपरच्या लेहेंग्याचे डिझाईन तर अप्रतिम आहेच, पण त्याचबरोबर तिच्या ओढणीवर लिहिलेले तिच्या पतीचे म्हणजेच राघवचे नाव या संपूर्ण पेहरावाला आणखीनच खास बनवते.
-
ओढणीवर राघवचे नाव लिहिण्यासाठी देखील जुना सोन्याचा धागा वापरण्यात आला आहे.
-
परिणीती चोप्राने रशियन एमराल्ड ज्वेलरी, मांग टिका, साधा मेकअप आणि डायमंड यांच्यासह तिचा वेडिंग लुक पूर्ण केला.
-
यावेळी राघवने पांढऱ्या रंगाची शेरवणी आणि मॅचिंग फेटा घातला होता. परिणीती आणि राघव पती-पत्नी म्हणून खूपच सुंदर दिसत होते.
-
चाहत्यांनीही आपल्या लाडक्या जोडीच्या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला असून त्यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
सर्व फोटो : परिणीती चोप्रा/इन्स्टाग्राम

येत्या ५ दिवसात ‘या’ ३ राशींना मिळेल प्रचंड धनलाभाची संधी? ‘चंद्र-मंगळ योग’ बनल्याने मिळू शकतात आनंदाच्या बातम्या