-
ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. एक नजर त्यांच्या सिने कारकिर्दीवर (सर्व फोटो सौजन्य-वहिदा रेहमान, इंस्टाग्राम पेज)
-
वहिदा रेहमान यांनी आत्तापर्यंत विविधरंगी भूमिका साकारल्या आहेत. त्यांची कारकीर्द खूप मोठी आहे.
-
वहिदा रेहमान यांनी गुरुदत्त, धर्मेंद्र, अमिताभ, दिलिप कुमार, देवआनंद यांच्यासह अनेक दिग्गजांसह काम केलं आहे.
-
वहिदा रेहमान यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात तामिळ सिनेमातून केली. मात्र त्यांना प्रसिद्धी मिळाली ती हिंदी सिनेमातून.
-
उत्तम अभिनय, भूमिकेत जीव ओतून काम करणं या गुणांमुळे त्यांचा एक वेगळा चाहता वर्ग तयार झाला आहे.
-
‘गाईड’ या सिनेमात त्यांनी केलेल्या अभिनयामुळे आणि त्यातल्या गाण्यांमुळे त्या घराघरात पोहचल्या. खास करुन आज फिर जिने की तमन्ना है गाणं असो किंवा मग मौसे छल हे गाणं.
-
मौसे छल या गाण्यातला वहिदा रेहमान यांचा खास मराठमोळा लुक
-
गुरुदत्त यांच्यासह त्यांची जोडी हिट ठरली. ‘प्यासा’, ‘कागज के फूल’, ‘चौदहवी का चांद’ ‘साहिब बिबी और गुलाम’ अशा सिनेमांमध्ये त्यांनी बरोबर काम केलं. त्यांची जोडी प्रेक्षकांनाही खूप आवडली.
-
वहिदा रेहमान यांनी १९५५ पासून काम करण्यास सुरुवात केली. १९५७ मध्ये प्यासा सिनेमा आला. त्यानंतर एकामागून एक खास सिनेमांमध्ये त्या काम करत राहिल्या आणि खास भूमिका साकारत राहिल्या.
-
चौदहवी का चांद हो या आफताब हो हे गाणं तर सुपरहिट ठरलं. आजही हे गाणं प्रेक्षकांच्या मनात रुंजी घालतं आहे.
-
राम और श्याम, ‘दिल दिया दर्द लिया’ या सिनेमांमध्ये त्यांनी दिलीप कुमार यांच्यासह काम केलं. दिलीप कुमार यांच्यासह त्यांची जोडी लोकांना आवडली होती.
-
तिसरी कसम या सिनेमांत त्या राज कपूर यांच्यासह झळकल्या. तर नील कमल या सिनेमात त्यांनी राज कुमार यांच्यासह काम केलं. या सिनेमातली गाणीही स्मरणीय ठरली.
-
खामोशी या सिनेमात त्यांचा हिरो राजेश खन्ना होता. याचाच अर्थ त्या काळातल्या सगळ्या सुपरस्टार्स बरोबर वहिदा रेहमान झळकल्या होत्या.
-
वहिदा रेहमान यांची सेकंड इनिंगही दमदार ठरली. चांदनी या सिनेमात त्यांनी विनोद खन्नाच्या आईचं काम केलं. त्यानंतर त्या चरित्र भूमिकांकडे वळल्या.
-
वहिदा रेहमान यांना आत्तापर्यंत विविध भूमिकांसाठी विविध अवॉर्ड्सनी सन्मानित करण्यात आलं आहे. त्या काळात मीना कुमारी, नूतन, मधुबाला, नर्गिस या सगळ्या अभिनेत्री होत्या. त्या सगळ्यांमध्ये वहिदा रेहमान यांनी स्वतःचं असं स्थान मिळवलं.
-
‘गाईड’साठी फिल्मफेअर, शिकागो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचं बेस्ट अॅक्ट्रेस अवॉर्ड, ‘तिसरी कसम’साठी BFJA बेस्ट अॅक्ट्रेसचं अवॉर्ड, ‘नील कमल’साठी बेस्ट अॅक्ट्रेसचं फिल्मफेअर, ‘रेश्मा और शेरा’ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तसंच ‘चांदनी’, ‘लम्हे’, ‘नमकीन’ या सिनेमांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं फिल्मफेअरमध्ये नामांकन मिळालं होतं.
-
वहिदा रेहमान यांनी ‘ओम जय जगदीश’, रंग दे बसंती या सिनेमांमध्येही काम केलं आहे. त्यांच्या भूमिका स्मरणात राहतील अशाच होत्या. लुकाछुपी बहुत हुई हे गाण तर डोळ्यात पाणी आणतं. याच गुणी अभिनेत्रीला जीवनगौरव पुरस्कार आता जाहीर झाला आहे.

भाजपाने विधानसभेच्या रिंगणात उतरवलेल्या २१ खासदारांपैकी कितीजण जिंकले, पराभूत झालेल्यांचं पुढे काय होणार?