-
‘आप’चे नेते राघव चड्ढा आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा २४ सप्टेंबरला लग्नबंधनात अडकले
-
राजस्थानच्या उदयपूरमधील ‘द लीला पॅलेस’मध्ये त्यांच्या शाही लग्नसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
-
पण राघव यांच्याअगोदर असे नेते आहेत ज्यांनी लग्नगाठ बांधली
-
बिहारचे उपमुख्यमंत्री सीएम तेजस्वी यादव यांनी ९ डिसेंबर २०२१ रोजी राहेलसोबत लग्न केले.
-
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ७ जुलै २०२२ रोजी गुरप्रीत कौरशी विवाह केला.
-
अखिलेश यादव आणि डिंपल यादव यांचा विवाह २४ नोव्हेंबर १९९९ रोजी झाला होता.
-
राजीव आणि सोनिया गांधी यांचा विवाह २५ फेब्रुवारी १९६८ रोजी झाला. (फोटो: इंडियन एक्सप्रेस आर्काइव्ह)
-
काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी तीन लग्न केले आहेत. सुनंदा पुष्कर त्यांची तिसरी पत्नी होती. सुनंदा आता या जगात नाहीत.
-
भाजपा खासदार वरुण गांधी आणि यामिनी रॉय चौधरी यांचा विवाह ६ मार्च २०११ रोजी वाराणसीमध्ये झाला.
-
माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो ९ नोव्हेंबर २०१६ रोजी दुसरे लग्न केलं. त्यांनी हवाई सुंदरी रचना शर्मासोबत लग्नगाठ बांधली.
-
अखिलेश यादव यांचे पुतणे तेज प्रताप सिंह हे लोकसभेचे खासदार राहिले आहेत. २६ फेब्रुवारी २०१५ रोजी लालू प्रसाद यांची धाकटी मुलगी राजलक्ष्मी यादव हिच्याशी त्यांचा विवाह झाला होता.
-
लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा आणि आरजेडी नेते तेज प्रताप यादव यांचा विवाह ऐश्वर्या रायसोबत झाला होता. मात्र, हे लग्न फार काळ टिकले नाही आणि दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

“सेटवर फक्त ५ जण, सगळे मॉनिटर्स बंद अन्…”, ‘अॅनिमल’मधील इंटिमेट सीनबद्दल तृप्ती डिमरीचं भाष्य; म्हणाली, “रणबीरने…”