-
ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही घोषणा केली आहे. वहिदा रेहमान या जुन्या काळातील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांनी देव आनंद, गुरुदत्त यांच्यासह अनेक दिग्गज अभिनेत्यांबरोबर काम केलं आहे. त्याचबरोबर दुसऱ्या इनिंगमध्ये चरित्र भूमिकाही मोठ्या ताकदीने साकारल्या आहेत. ‘रंग दे बसंती’ सिनेमातल्या मिसेस राठोड असोत किंवा ‘ओम जय जगदीश’मधल्या सरस्वतीदेवी बत्रा प्रत्येक भूमिका त्यांनी खूप ताकदीने साकारल्या आहेत. विविधरंगी अभिनयाचे रंग आपल्या प्रत्येक कलाकृतीत भरणाऱ्या वहिदा रेहमान यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. (फोटो : @waheedaxrehman/instagram)
-
Devika Rani : देविका राणी या दादासाहेब फाळके पुरस्कारावर आपलं नाव कोरणाऱ्या पहिल्या महिला कलाकार आहेत. देविका राणी यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिली अभिनेत्री म्हटलं जातं. हा पुरस्कार त्यांना १९६९ मध्ये मिळाला होता. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
Ruby Myers :रुबी मेयर्स यांना १९७३ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. रुबी मेयर्स यांना सुलोचना या नावानेही ओळखले जाते. १०३० च्या दशकात सुलोचना भारतीय चित्रपट क्षेत्रातील शीर्ष अभिनेत्रींपैकी एक होत्या. (PC : Still from Film)
-
Kanan Devi
भारतीय चित्रपटसृष्टीतील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल कानन देवी यांना १९७६ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या बंगाली कलाकार होत्या. (PC : Still from Film) -
Durga Khote
दुर्गा खोटे या त्यांच्या काळातील हिंदी आणि मराठी चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. १९८३ मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी जेव्हा बॉलीवूडमध्ये येण्याचा निर्णय घेतला, तेव्हा महिलांनी अभिनय किंवा चित्रपटांमध्ये काम करणं घृणास्पद काम मानलं जात होतं, त्यामुळेच त्या चित्रपटसृष्टीत येण्याआधी महिलांच्या भूमिका पुरुष कलाकार वठवायचे. (PC : Still from Film) -
Lata Mangeshkar
१९८९ मध्ये भारताच्या गानकोकीळा लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराशिवाय २००१ साली लता मंगेशकर यांना ‘भारतरत्न’ पुरसाकारानेही सन्मानित करण्यात आलं आहे. (PC : @lata_mangeshkar/instagram) -
Asha Bhosle
लता मंगेशकर यांची धाकटी बहीण आशा भोसले यांनाही दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. २०० साली त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांनी आतापर्यंत 16 हजारांहून अधिक गाणी म्युझिक इंडस्ट्रीला दिली आहेत. हिंदी व्यतिरिक्त त्यांनी मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, भोजपुरी, तमिळ, मल्याळम, इंग्रजी आणि रशियन भाषेतही गाणी गायली आहेत. (PC : @asha.bhosle/instagram) -
Asha Parekh
आशा पारेख यांना 2022 साली दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ६० च्या दशकात आशा पारेख यांनी आपल्या अभिनयाने सिनेप्रेमींच्या हृदयात स्थान निर्माण केले होते. (PC : @ashaparekhofficial/instagram)

“पैशांनी भरलेली कपाटं, दोन दिवसांपासून मोजणी सुरू”, पंतप्रधान मोदी म्हणाले, “नोटांच्या ढिगाऱ्याकडे पाहून…”