-
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा विवाहसोहळा २४ सप्टेंबरला उदयपूरमध्ये थाटामाटात पार पडला.
-
दोघांच्या शाही विवाहसोहळ्याला बॉलीवूड सेलिब्रिटी आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती.
-
उदयपूरमध्ये थाटामाटात लग्न केल्यावर दुसऱ्या दिवशी परिणीती चोप्रा राघव चड्ढांसह दिल्लीतील तिच्या सासरच्या घरी गेली.
-
लग्नानंतर पहिल्यांदाच सासरी जाताना नियॉन रंगाचा ड्रेस, हातात चुडा, कपाळावर कुंकू, गळ्यात मंगळसूत्र असा पारंपरिक लूक परिणीतीने केला होता.
-
परिणीती आणि राघवचे दिल्ली विमानतळावरील अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
यावेळी अभिनेत्रीच्या गळ्यातील मंगळसूत्राने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
-
परिणीतीच्या मंगळसूत्रात इन्फिनिटी (Infinity symbol) चिन्ह पाहायला मिळत आहे. तसेच मंगळसूत्रात काळे मणी आणि सोन्याची बारीक चेनही आहे.
-
इन्फिनिटी चिन्हाच्या बरोबर मधोमध गोलाकार हिरा असल्याचं फोटोमध्ये दिसत आहे. परिणीतीची बहीण प्रियांका चोप्राचं मंगळसूत्र सुद्धा अशाप्रकारे डिझाईन करण्यात आलं होतं.
-
सोशल मीडियावर परिणीतीच्या साध्या आणि हटके मंगळसूत्राचे फोटो व्हायरल झाले आहेत.

“भगीरथ बियाणींच्या मुलीला कुणी छळलं?”, अजित पवारांवर टीका करताना आव्हाडांचा गौप्यस्फोट