-
नाटक, चित्रपट, राजकारण या सगळ्यांमध्ये सक्रिय असणाऱ्या अभिनेत्री म्हणजे प्रिया बेर्डे.
-
प्रिया बेर्डे यांनी त्यांच्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीत एक काळ गाजवला.
-
प्रिया बेर्डे या सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात.
-
नुकतंच त्यांनी पुण्यातील मानाच्या गणपतींचे दर्शन घेतले. याचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
प्रिया बेर्डे यांनी कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग ,केसरी वाडा, श्रीमंत दगडूशेठ गणपती, मंडई गणपती, भाऊ रंगारी या गणपतींचे दर्शन घेतले.
-
“आज मी पुण्यातील मानाच्या सर्व गणपतींचे दर्शन घेतले.”
-
“गेली अनेक वर्षे या सर्व गणपतींचे दर्शन घ्यावे असं वाटत होतं तो योग आज आला.”
-
“काय कमाल वातावरण होतं, अख्ख पुणे गणपतीमय झालंय.”
-
“यावर्षी गणेशाचे देखावे जास्तीत जास्त मंदिरांच्या प्रतिकृती आहेत, सगळ्या तीर्थक्षेत्राचे दर्शन एकट्या पुण्यात मिळाले”, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
-
प्रिया बेर्डे यांच्या गणपती दर्शनाचे हे फोटो सध्या व्हायरल होत आहे. त्यांच्या या फोटोवर लाईक्सचाही पाऊस पडताना पाहायला मिळत आहे.

“२४ डिसेंबरनंतर पश्चाताप…”, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा; म्हणाले, “फडणवीसांना पुन्हा उघडे…”