-
अर्चना पूरन सिंहने अनेक बॉलिवूड चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
६१ वर्षीय अभिनेत्री अर्चना पूरन सिंह आज टीव्हीची लाफ्टर क्वीन म्हणून ओळखली जाते. मात्र हे यश मिळवायला तिला खूप मेहनत करावी लागली.
-
फिल्मी पार्श्वभूमी नसल्यामुळे अर्चना पूरन सिंगला करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये खूप संघर्ष करावा लागला.
-
मुंबईत मॉडेल बनण्यासाठी आलेल्या अर्चनाला तिच्या पहिल्या चित्रपटात केवळ 10 सेकंदाची भूमिका मिळाली.
-
अर्चनाने 1982 मध्ये रिलीज झालेल्या ‘निकाह’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात ती एका गाण्यात केवळ 10 सेकंदासाठी दिसली होती.
-
यानंतर ती अनेक प्रिंट जाहिरातींमध्ये दिसली. 1987 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जलवा’ या चित्रपटातून तिने खऱ्या अर्थाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
-
जलवा चित्रपटात ती अभिनेता नसीरुद्दीन शाहसोबत दिसली होती. हा चित्रपट हिट झाला तरीही अर्चना तिच्या अभिनयाने दिग्दर्शक आणि निर्मात्यांना खूश करण्यात अपयशी ठरली.
-
यानंतर तिने बी-ग्रेड चित्रपटांमध्ये नशीब आजमावले. यामध्ये तिला यश मिळाले मात्र लवकरच तिने अशा चित्रपटांपासून स्वतःला दूर केले. यानंतर ती मोठ्या बॅनरच्या चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका आणि आयटम साँगमध्ये दिसली.
-
चित्रपटांव्यतिरिक्त अर्चनाने अनेक टीव्ही शोमध्येही काम केले आहे, ज्यात ‘श्रीमान श्रीमती’, ‘जाने भी दो यारो’, ‘नहले पे दहला’ आणि ‘वाह क्या सीन’ सारख्या मालिकांचा समावेश आहे.
-
ती अनेक कॉमेडी शोचा भाग राहिली आहे. सध्या ती छोट्या पडद्यावर तिची जादू दाखवत आहे. ‘द कपिल शर्मा शो’ या कॉमेडी शोमध्ये ती परीक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार अर्चना पूरन सिंग या शोच्या एका एपिसोडसाठी तब्बल 10 लाख रुपये मानधन घेते.
-
हसण्याबरोबरच अर्चना पूरन सिंग तिच्या लग्झरी लाइफसाठीही चर्चेत असते. आपल्या मेहनतीच्या जोरावर तिने कोटींची संपत्ती निर्माण केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिची एकूण संपत्ती 254 कोटी रुपये आहे.
-
अर्चनाचा मुंबईतील मड बेटावर आलिशान बंगला आहे जिथे ती पती आणि मुलांसोबत राहते. या बंगल्याची किंमत जवळपास 12 कोटी रुपये आहे. तसेच तिच्याकडे BMW, Mercedes सारख्या अनेक आलिशान गाड्या आहेत.

हार्दिक पंड्याच्या मुंबई इंडियन्समधील पुनरागमनावरून मनसेचा सत्ताधाऱ्यांना टोला; म्हणाले, “तुमचा स्वाभिमान लिलावात…”