-
नुकताच ‘अॅनिमल’ चित्रपटाचा टीझर रिलीज झाला. यामध्ये रणबीर कपूर अतिशय खतरनाक अवतारात दाखवण्यात आला आहे. मात्र याहीपेक्षा जास्त तो या चित्रपटातील त्याच्या तरुण लूकमुळे चर्चेत आहे.
-
रणबीर कपूरला या चित्रपटात तरुण दाखवण्यासाठी व्हीएफएक्सचा वापर करण्यात आला आहे. रणवीरच्या आधी अनेक कलाकार VFX च्या मदतीने पडद्यावर यंग लूकमध्ये दिसले आहेत.
-
VFX हे एक असे तंत्र आहे ज्याद्वारे कलाकारांना तरुण किंवा वृद्ध दाखवले जाऊ शकते. आजकाल अनेक चित्रपटांमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. मात्र यासाठी चित्रपट निर्मात्यांना करोडो रुपये खर्च करावे लागतात.
-
आज आपण अशा काही कलाकारांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांना तरुण दाखवण्यासाठी चित्रपटात व्हीएफएक्सचा वापर करण्यात आला आहे.
-
शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातही शाहरुख खानला तरुण दाखवण्यासाठी व्हीएफएक्सचा वापर करण्यात आला आहे.
-
‘भारत’ या चित्रपटातही व्हीएफएक्सचा वापरचा वापर करून अभिनेता सलमान खानला तरुण दाखवण्यात आले आहे.
-
‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटात आमिर खान तरुण दिसण्यासाठी VFX चा वापर करण्यात आला आहे.
-
अभिनेत्री करिना कपूरही आमिर खानसह ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटात दिसली होती. चित्रपटात तरुण दिसण्यासाठी तिच्या चेहऱ्यावरही व्हीएफएक्सचा वापर करण्यात आला आहे.
-
‘अतरंगी रे’ चित्रपटात अक्षय कुमारला तरुण दाखवण्यात आले होते. मात्र तो तरुण दिसण्यासाठी चित्रपटात व्हीएफएक्सचा वापर करण्यात आला आहे.
-
‘2.0’ चित्रपटात रजनीकांत हा रोबोट चिट्टीच्या भूमिकेत होता. हे पात्र तरुण दिसण्यासाठी चित्रपट निर्मात्यांनी व्हीएफएक्सचा वापर केला आहे.

मुंबई : प्रदूषणविषयक तक्रारींसाठी महानगरपालिकेचा व्हॉट्सअॅप क्रमांक, नागरिकांना छायाचित्रासह तक्रार करता येणार