-
साऊथ चित्रपटाचा सुपरस्टार विशालने नुकताच सेन्सॉर बोर्डावर लाच घेतल्याचा आरोप केला आहे. आपला चित्रपट पास करण्यासाठी सेन्सॉरला लाच द्यावी लागली, असे तो म्हणाला. त्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करून ही माहिती दिली आहे. (स्रोत: @actorvishalofficia/instagram)
-
विशालने दक्षिण इंडस्ट्रीतील अनेक तमिळ भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांचे पूर्ण नाव विशाल कृष्णा रेड्डी आहे. (स्रोत: @actorvishalofficia/instagram)
-
अभिनेता असण्यासोबतच तो निर्माता देखील आहे. चेन्नईमध्ये ‘विशाल फिल्म फॅक्टरी’ नावाने त्यांची स्वतःची निर्मिती कंपनी आहे. (स्रोत: @actorvishalofficia/instagram)
-
विशालचा जन्म २९ ऑगस्ट १९७७ रोजी चित्रपट निर्माते जी.के. रेड्डी यांच्या घरी घडली. त्याचे वडील जी. के रेड्डी हे निर्माते असून त्याचा भाऊ विक्रम कृष्णा देखील एक अभिनेता आणि निर्माता आहे. (स्रोत: @actorvishalofficia/instagram)
-
त्याचे कुटुंब मूळचे आंध्र प्रदेशातील नेल्लोरचे आहे. विशालचे शालेय शिक्षण चेन्नईच्या डॉन बॉस्को मॅट्रिक्युलेशन उच्च माध्यमिक विद्यालयातून झाले. त्यानंतर त्यांनी चेन्नईच्या लोयोला कॉलेजमधून व्हिज्युअल कम्युनिकेशनमध्ये पदवी घेतली. (स्रोत: @actorvishalofficia/instagram)
-
विशालने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून केली होती. १९८९ मध्ये ‘जाडीकेथा मूडी’ या तमिळ चित्रपटातून त्याने पदार्पण केले. २००४ साली ‘चेल्लामाई’ या तमिळ चित्रपटात तो मुख्य भूमिकेत दिसला होता. (स्रोत: @actorvishalofficia/instagram)
-
विशालने आत्तापर्यंत ‘संदाकोझी’, ‘थिमिरू’, ‘थमिरापाराणी’, मल्याळम चित्रपट ‘खलनायक’, ‘इरुम्बू थिराई’ आणि ‘थुप्परीवलन २’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. (स्रोत: @actorvishalofficia/instagram)
-
नुकताच विशालचा सायन्स फिक्शन चित्रपट मार्क अँटनी रिलीज झाला आहे. १५ सप्टेंबर रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत दुप्पट कमाई केली आहे. विशाल आता लवकरच हा चित्रपट हिंदीतही प्रदर्शित करण्याचा विचार करत आहे. (स्रोत: @actorvishalofficia/instagram)

धीरज साहूंच्या घरात नोटांचा पर्वत, खासदाराच्या ‘दौलती’बाबत काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, अडचणी वाढल्या