-
झी मराठीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रेक्षकांची मन जिंकताना दिसत आहे.
-
ही मालिका आता एका रोमांचक वळणावर आली आहे.
-
कुटुंबाचा मान राखण्यासाठी अक्षरा अधिपतीबरोबर लग्नासाठी तयार होते.
-
दुसरीकडे भुवनेश्वरी खुश आहे कारण अक्षराला अद्दल घडवण्यासाठीच हा सगळा घाट घातला आहे.
-
लग्नातच इरा खोट बोलल्याचं अक्षराला कळणार आहे आणि अक्षराला याचा खूप मोठा धक्का बसणार आहे.
-
आता नियती ही लग्नगाठ बांधेल का? सगळं खरं कळल्यावर अक्षरा लग्नाला तयार होईल का हे बघणं मनोरंजक ठरणार आहे.
-
भुवनेश्वरीने राजशाही घाट घातलाच आहे तर लग्न समारंभ मोठा असणारच.
-
झी मराठीच्या मालिकेचे सेट आणि जागा नेहमी सुंदर अश्या निवडल्या जातात आणि १ ऑक्टोबरच्या २ तासांच्या विशेष भागात प्रेक्षकांना एक भव्य असा लग्न सोहोळा पाहता येईल.
-
या भागात एक खास सरप्राईझ पण असणार आहे.
-
मालिकेतल्या कलाकारांना हा लग्न विशेष भाग शूट करतांना खूप मज्जा आली आणि एक वेगळाच उत्साह होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : झी मराठी/इन्स्टाग्राम)

Madhya Pradesh Election Result 2023 Live : आता मध्य प्रदेशचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? शिवराज सिंह यांचा मुलगा म्हणाला…