-
सध्या बॉलिवूडमध्ये सीक्वल्सबरोबरच रिमेकचेही वारे वाहताना दिसत आहेत. बऱ्याच सुपरहीट चित्रपटांचे रिमेकही चांगलेच हीट ठरले आहेत.
-
गेल्या काही वर्षात दाक्षिणात्य तसेच मराठी भाषेतीलही बऱ्याच चित्रपटांचे रिमेक आपल्याला बॉलिवूडमध्ये पाहायला मिळाले.
-
आता ९० च्या दशकातील काही सुपरहीट चित्रपटांच्या रिमेकची जोरदार चर्चा सुरू आहे. ९० मधल्या काही जबरदस्त हीट ठरलेल्या चित्रपटांचे रिमेक येणाऱ्या काळात पाहायला मिळायची शक्यता आहे.
-
अनिल कपूर व माधुरी दीक्षित यांचा एन चंद्रा दिग्दर्शित ‘तेजाब’चा रिमेक लवकरच येणार असल्याची चर्चा आहे. इतकंच नव्हे तर यात रणवीर सिंह आणि जान्हवी कपूर ही मुख्य भूमिकेत असतील अशीही चर्चा आहे. निर्माते मुराद खेतानी यांनी या चित्रपटाचे हक्क विकत घेतले असल्याचंही स्पष्ट झालं आहे.
-
संजय दत्तचा ‘खलनायक’सुद्धा रिमेक करणार असल्याची चर्चा सुरू आहे.
-
मध्यंतरी सुभाष घई यांनी या चित्रपटाच्या सीक्वलवर भाष्य केलं होतं आता याचे निर्माते राजकुमार संतोषी ‘खलनायक’चा रिमेक करण्याचा विचार करत असल्याचं स्पष्ट झालं आहे.
-
काही मीडिया रीपोर्टनुसार जॅकी श्रॉफ, अनिल कपूर व माधुरी दीक्षित यांच्या ‘राम लखन’चा सुद्धा लवकरच रिमेक समोर येणार आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीचा हा अत्यंत आवडता चित्रपट आहे आणि रोहितच याचा रिमेक करणार असल्याची चर्चा आहे.
-
सलमान खान व माधुरी दीक्षितच्या ‘हम आपके है कौन’ने एकेकाळी बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला. आजही प्रेक्षक हा चित्रपट अगदी न कंटाळता पाहतात.
-
याचे निर्माते दिग्दर्शक सूरज बडजात्या यांच्याही डोक्यात या चित्रपटाच्या रिमेकचे विचार घोळत असल्याचं सांगितलं जात आहे. अद्याप याबद्दल कोणीही अधिकृत घोषणा केलेली नाही (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)

देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं विधान, “पंकजा आणि धनंजय मुंडेंना एकच विनंती आहे की, तुम्ही दोघं…”